Home पश्चिम महाराष्ट्र शेवटी मुलांची माया जिंकली अन त्यांना आपली आई मिळाली , ???

शेवटी मुलांची माया जिंकली अन त्यांना आपली आई मिळाली , ???

101
0

शेवटी मुलांची माया जिंकली अन त्यांना आपली आई मिळाली , ???

अमीन शाह ,

मनमाड ( जि.नाशिक ) : दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग तसा कुणाच्याही नशिबी येत नाही . पण मनमाडमधील मृत मातेच्या नशिबात हा योग आला . कोरोना काळात मृत आईचा दफन केलेला देह आम्हाला मिळावा , तो आमच्या गावी आम्ही दफन करू , यासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजवणारी मुले एकीकडे आईसाठी व्याकुळ होतात . तर दुसरीकडे आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून जबाबदारी झटकणारी मुले कृतघ्न झालेली दिसतात . अगदी ऊर भरून यावा , अशी ही हृददायक घटना मनमाडला घडली आहे .

मृत आईची मुलांशी झालेली ताटातूट पुन्हा जुळली गुरुवारी ( ता .१७ ) सकाळी आठला मालेगावच्या कब्रस्तानातून पोलिस , शासकीय अधिकारी , ख्रिस्ती धर्ममंडळी , पंचांच्या समक्ष मंजूलताबाईं चा दफन केलेल्या मृतदेहाची शवपेटी विधिवत काढन्यात आली . तेथून शवपेटी मोटारीने मनमाडला आल्यानंतर येथील ख्रिस्ती कब्रस्तानात विधिवत त्याच उपस्थित मंडळींच्या समक्ष पुन्हा दफन विधी करण्यात आला ,
अगदी ऊर भरून यावा , अशी घटना मनमाडला घडली कोरोना काळात मनमाड येथील मंजुलता वसंतराव क्षीरसागर यांना हृदयविकारामुळे छातीत दुखू लागल्याने त्यांना मनमाडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले . तेथून त्यांना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले तेथे न्यूमोनियाचे निदान करून त्यांची २२ सप्टेंबरला कोरोना टेस्ट करून संशयित रुग्ण सहारा कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते . मात्र त्याच सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला . आईचे निधन झाल्याने दोन्ही मुले शोकसागरात बुडाली . कोरोना रिपोर्ट यायचा बाकी होता . आईचा अंत्यविधी मनमाडला करतो . म्हणून प्रशासन अधिकाऱ्यांच्या विनवण्या केल्या . मात्र रिपोर्ट आलेला नाही . त्यामुळे संशयित असल्याने अधिकाऱ्यांनी सफशेल नकार दिला . त्यामुळे दुसऱ्या दिवशी २३ सप्टेंबरला ख्रिस्ती धर्म परंपरेनुसार संत पॉल चर्चच्या नामपूर रोड , मालेगाव कॅम्प येथील कब्रस्तानात दफनविधी झाला . मुलांचे अंतःकरण व्याकुळ तिसऱ्या दिवशी ( ता . २४ ) रिपोर्ट निगेटिव्ह आला . त्यामुळे आता काय करायचे , आईचा दफनविधी तर झाला , या पेचात मुलगा सुहास आणि संदीप पडले . आपली आई आपल्या जवळच पाहिजे , या भावनेमुळे मुलांचे अंतःकरण व्याकुळ झाले . त्यामुळे मुलांनी आईचा कब्रस्तानातील मृतदेह मिळावा म्हणून मालेगाव महापालिकेकडे अर्ज केला . अर्ज पाहून प्रशासनही चक्रावले . महिनाभर विविध कार्यालयांच्या पायऱ्या झिजवल्या . हो – नाही करत शासकीय आणि धार्मिक सर्वच पूर्तता केली . अखेर आईवरील मुलांचे प्रेम पाहून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर मृतदेह स्थलांतराची परवानगी दिली . आई गेल्याचे दुख आणि आई जवळ आल्याचा आंनद अशी द्विधास्थिती मुलांमध्ये होती .