Home महाराष्ट्र एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या तिघांचा मृत्यू एक गंभीर

एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या तिघांचा मृत्यू एक गंभीर

190

एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या तिघांचा मृत्यू एक गंभीर ,

पोलीसवाला न्युज नेटवर्क ,

नालासोपारा : – विरारच्या साईनाथ नगरमध्ये राहणाऱ्या एकाच परिवारातील चौघांनी शनिवारी पहाटे नालासोपारा ते वसईच्या दरम्यान रेल्वे खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . यात तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक 10 वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे . तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भर्ती केले आहे . वसई रेल्वे पोलिसांनी सदर प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून ही आत्महत्या तर नाही ना याचा तपास करत आहे . नंदा जंगम ( 55 ) , सोमनाथ ( 31 ) , प्रमिला ( 35 ) अशी मृत व्यक्तींची नावे आहे . तर 10 वर्षांची चिमुकली समीक्षा ही गंभीर जखमी आहे .