Home बुलडाणा अनुदाना साठी विनाअनुदानित शिक्षक आक्रमक…..

अनुदाना साठी विनाअनुदानित शिक्षक आक्रमक…..

246

 

अनुदान द्या अन्यथा इच्छामरणाची अनुमती द्या

बुलढाणा :- प्रा. तन्जीम हुसैन
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महविद्यालय शाळा कृती संघटने च्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून आपल्या विविध मांगण्याचा निवेदन कलेक्टर साहेब यांना देण्यात आले.
निवेदनात विनाअनुदानीत शिक्षकांचे मांगण्या या प्रकारे आहेत 146 व 1638 घोषित उच्च माध्यमिक विद्यालय 24 फेब्रुवारी 2020 च्या पुरवणी नुसार अनुदान वितरणाचा आदेश निर्गमित करावा त्या साठी शिक्षकांच्या भावना शासन पर्यंत पोहचावे व अघोषित उच्च माध्यमिक विद्यालय निधी सहित घोषित करणे या प्रमुख मांगण्यांचा निवेदन देण्यात आला.
१३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषीत व अनुदान मंजुर उच्च माध्यमिक कॉलेज ला २४ फेब्रुवारी २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशात मंजुर पुरवणी मागणी व्दारे १०६ कोटी ७४ लाख ७२ हजार रूपये मंजुर असलेला निधी तात्काळ वितरीत करण्यासंदर्भातील शासन आदेश निर्गमीत करण्यात यावा . मागील १८ वर्षापासुन विनावेतन वेठबिगारीचे जीवन जगणाऱ्या शिक्षक बांधवांवर उपास मारीची वेळ आलेली आहे पगार मंजूर असून त्यांना तो देण्यात येत नाही हा विनाअनुदानीत शिक्षकावर अन्याय आहे.
नुसत्या तपासणीच्या नावाखाली वितरणाचा आदेश निर्गमीत केला जात नाही. तरी तपासणीच्या अहवालाच्या अधीन राहुन याच अधिवेशनात निधी वितरणाचा आदेश निर्गमीत करावा यासाठी संघटने कडुन राज्यभर अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया समोर शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी दिनांक १४/१२/२०२० ला शिक्षकांनी सोशल दिस्टंसिंग , मास्क व सॅनिटायजर चा उपयोग करून धरणे आंदोलन केले . वितरणाचा आदेश काढुन पगार सुरू करावा ही शिक्षकांची विनंती असून शासनाने तात्काळ ह्या मांग्ण्या पूर्ण करावे.
या आंदोलनात महारष्ट्र राज्य उच्च माध्यमिक क.म कृती संघटने चे व जिल्हा भरातून शिक्षक क. म कृती संघटने चे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कीलबीले ,मोहन रौदळे, तनजीम सर, सै.इम्रान सर,गजानन निकम,गाझी सर,,सतीश गावंडे,मोईन सर, इत्यादी जिल्यातील विनाअनुदानीत शिक्षक उपस्थित होते.
बॉक्स:- या आंदोलनाला पाठिंबा देत शिक्षक आघाडी चे संस्थापक अध्यक्ष डॉ.निलेश गावंडे यांनी उच्च माध्यमिक शिस्कांच्या समस्यकरिता मी बांधील राहील जेव्हा पण त्यांना शैक्षणिक अडचणी भेट्सावेल त्या वेळेस मी सदैव त्यांच्या सेवेत साम दाम दंड भेद वापरून हजर राहील सोबतच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ने ही पाठिंबा दर्शविला.