Home जळगाव डाॅ. वकार शेख यांना “खान्देश भूषण पुरस्कार” प्रदान

डाॅ. वकार शेख यांना “खान्देश भूषण पुरस्कार” प्रदान

162

 

जलगांव:एजाज़ गुलाब शाह
आदिलशहा फारूकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डाॅ वकार शेख यांना मा. विजय पवार, गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते *”खान्देश भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मा. उपमहापौर डाॅ. करीम सलार, अब्दुल मजिद जकारिया व अन्य पदाधिकारी उपस्थित होतं.
डाॅ वकार शेख हे इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम महाविद्यालयात राज्यशास्र विषयाचे विभाग प्रमुख म्हणून गेल्या 16 वर्षापासून कार्यरत असून महाराष्ट्र राज्यशास्र परिषदेचे ते सहसचिव आहेत. त्यांचे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्वपूर्ण योगदान असून शिक्षणाच्या प्रवाहातून अलिप्त विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण प्रक्रियेत आणायचे कार्य उल्लेखनीय आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर, मौलाना अब्दुल कलाम मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून वंचित विद्यार्थ्यांकरीता कार्य करीत आहेत,
“महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा राजकीय सहभाग” या प्रबंधातून त्यांनी मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रावर मौलिक संशोधन केलेले आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संशोधक कार्याचा सन्मान करण्यात आला.