Home बुलडाणा हरभरा अनुदानापासून शेतकरी वंचित

हरभरा अनुदानापासून शेतकरी वंचित

55
0

रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:-
खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या हलगर्जीपणामुळे देऊळगावराजा तालुक्यातील जवळपास सोळाशे शेतकरी शासकीय अनुदानापासून वंचित आहे
2017-18 या वर्षी शासनाने हरभरा खरेदी न केल्याने शेतकर्‍यांसाठी शासनाने प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर केले होते मात्र खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष आणि सचिवांनी शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन न केल्याने तालुक्यातील जवळपास 1600 शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले
जर वेळीच अध्यक्ष आणि सचिव यांनी अर्ज ऑनलाईन केले असते तर तालुक्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले नसते शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानास अध्यक्ष व सचिव जबाबदार आहेत असा सूर वंचित शेतकऱ्यांमधून निघत आहे
*कुंपणच जेव्हा शेत खातय*
खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तथा सचिव हे आमदार पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री यांचे मर्जीतील असून खरेदी विक्री संघावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण असताना सुद्धा पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील सोळाशे शेतकरी आपल्या हक्काच्या अनुदाना पासून वंचीत आहेत ज्यांना अनुदान मिळाले नाही आशा अनुदानापासून वंचित मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळणार आणि शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या मर्जीतील अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर काय कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांचे आणि मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे