सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार
विदर्भ समन्वय प्रमोद वालदे
वर्धा , दि. १४ :- मुंबई च्या कोरो संघटनेमार्फत गावं पातळीवरील विषमता दूर करण्याकरिता सामाजिक बदलाची प्रक्रिया सुरू असुन गावस्तरावर कार्यरत विविध ग्रामीण युवकांच्या माध्यमातून विविध विषयांवर काम करून विषमता दूर करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे विदर्भ समन्वयक प्रमोद वालदे यांनी आपले मत व्यक्त केले.
विकास भवन चंद्रपुर प्रशिक्षण केंद्र येथे पार पडलेल्या तीन दिवशीय प्रशिक्षणात विषमता दूर करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागात काम करतांना आपल्याला आपल्या संस्थेचे व्हिजन स्पष्ट असायला हवे, अगदी महात्मा जोतिबा फुले यांचे प्रमाणे, आपण आपले कार्य करतांना व्हिजन पूर्ण होई पर्यंत प्रयत्नशील असले पाहिजे. व्हिजन पर्यंत जातांना मार्ग, रस्ता आपोआपच मिळत असून ध्येय गाठण्यासाठी प्रशिक्षनार्थीनी कुठल्याही प्रसंगी आत्मविश्वास राखून सतत लढा दिला पाहिजे, कारण सामाजिक असमानता असणाऱ्या समाजामध्ये अनेक समस्याना तोंड देत सामोरे जावे लागले आणि म्हणूनच संविधानाची मूल्ये जोपासत आपण पुढे गेले पाहिजे असे आवाहन विदर्भातील सर्व संस्था व कार्यकर्त्याना यावेळी प्रमोद वालदे यांच्याकडून करण्यात आले.
चंद्रपूर येथील विकास केंद्र प्रशिक्षण संस्थाच्या सभागृहामध्ये झालेल्या प्रशिक्षणात खेळ गाणी व खेळी मेळीच्या वातावरणात अनेक सत्र घेण्यात आले. गावपातळीवर काम करण्याऱ्या संस्था, संघटना व कार्यकर्ते यांनी समता, बंधुता व न्याय अशी मूल्ये समाजामध्ये रुजविण्यासाठी कोरो संघटनेची प्रक्रिया व्यापक होऊन ती बळकट व्हावी यासाठी अश्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र भर होत आहे. विदर्भ स्तरावर पार पडलेल्या या कार्यशाळेत प्रामुख्याने कोरो संघटना मुंबईचे प्रशिक्षक सचिन अहिरे, विदर्भ समन्वयक प्रमोद वालदे, दिपक मरघडे, यांनी प्रशिक्षणा मध्ये विविध सत्रे घेतली. या प्रक्रिये मध्ये काम करणाऱ्या माध्यम साक्षरता ग्रामीन विकास संस्था बोपापूर दिघी सह विदर्भातील संस्था सहभागी होत्या.