Home बुलडाणा खबरदार,

खबरदार,

151

गॅस सिलेंडर चा स्फोट पाच घरे जळाली ,

बुलढाणा ,

घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पाच घरे आगीत भस्मसात झाल्याची घटना काल , 5 नोव्हेंबरच्या रात्री 8 च्या दरम्यान अटकळ ( ता . बुलडाणा ) येथे घडली . अटकळ येथील नंदाराम श्यामभाऊ दांडगे यांच्या घरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला . वेळीच घरातील सर्व सदस्य बाहेर पळाल्याने जीवितहानी झाली नाही . परंतु थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या पाच घरांचे मोठे नुकसान झाले.नंदराम दांडगे यांच्या घरातील धान्य , कपडे जुळून खाक झाले . घटनेची माहिती मिळताच तहसीलदार श्री . खंदारे तसेच बुलडाणा नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनस्थळी दाखल झाले . आग नियंत्रणात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मेहनत घ्यावी लागली . आज सकाळी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनीसुद्धा घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .

—————–/——-/———-///—-

अंगावर पेट्रोल ओतून नगरसेवकांचा आत्महत्येचा ,

जळगाव जामोद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशिष बोबडे आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकांतील वादाने आज , 6 नोव्हेंबरला हिंसक रुप धारण केले . मुख्याधिकाऱ्यांशी तुतू मैमै झाल्यानंतर शिवसेना नगरसेवक गजानन वाघ , रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला . त्यामुळे मोठी खळबळ उडाली . ते पेट्रोल ओतून घेत असताना पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला . या प्रकारामुळे भांबावलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी माघार घेतली .
————–//—–/—————-/
सैलानी दर्गा वर आलेल्या भाविकांच्या दोन वाहनांना आग वाहने जळून खाक ,

 

पिंपळगाव सराई गावाजवळच हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे . येथे संपूर्ण देशभरातून लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात . मागील 8 महिन्यापासून कोरोना महामारीमुळे अनेक भाविक सैलानीला येत नव्हते परंतु आता प्रशासनाने अनेक प्रतिबंध उठवले आहे त्यामुळे काही भाविक सैलानीला येऊन बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन जात आहे . अशातच नांदेड जिल्ह्यातून काही भाविक क्रूजर वाहन भाड्याने करून सैलानी येथे आले होते . आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास क्रूजर गाडीला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली व ही गाडी पूर्ण जळून खाक झाली.नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आतोनात प्रयत्न केला होता . क्रुसरच्या बाजुलाच उभा असलेला लोडिंग एपे थोड्या प्रमाणात जळाला आहे . या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसली तरी क्रुझर वाहन संपूर्ण जळाली आहे . सदर क्रूजर वाहन शेळगाव छत्री तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील देविदास मारुती डोंगरे यांची असल्याची माहिती मिळाली आहे .

——————/——————–

मोबाईल लंपास करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

खामगाव येथे आठवडी बाजारात भाजी खरेदी करीत असतांना दोन जणांचे महागडे मोबाईल लंपास झाले होते . भाजी घेत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या खिशातून मोबाईल लंपास केले होते या प्रकरणी एक महिला संशयस्पद फिरत असतांना दिसून आली पोलिसांनी तिची झडती घेतली असता तिच्या जवळ चोरीस गेलेले मोबाईल मिळून आले या प्रकरणी पोलिसांनी अंतरज येथील सुनिता भोसले या महिलेस ताब्यात घेतले आहे पुढील तपास पोलीस करीत आहे ,

—//–––————————–/

बुलडाणा येथे वरली अड्डा अवेध दारू वर पोलिसांची कार्यवाही ,

आज बुलडाणा शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे यांनी आपल्या डीबी पथकासह जांभरून मार्गावरील 2 वरली अड्डयावर धाड टाकली आहे.तसेच बुलडाणा एलसीबी ने ही अवैध दारू विक्रेत्याना पकडले आहे.बुलडाणा शहरात आज 2 वरली अड्डे व 3 अवैध दारूच्या ठिकाणावर कार्रवाई करण्यात आली आहे . या प्रकरणी वरली लिहणारे आरोपी शेख इरफान शेख सुभान रा . जोहर नगर , बुलडाणा याच्याकडून 1355 व राजेश्वर किशोर आव्हाड रा.वीरलहुजी नगर , बुलढाणा याच्याकडून 1235 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.त्याच प्रमाणे अवैध दारू विकणारे आरोपी दिव्य संजय जाधव रा . कैकाडीपुरा , बुलडाणा 850 , रवी रमेश गवई रा.वार्ड , क्र .2 , बुलडाणा याच्या कडून 685 तसेच येळगाव फाट्यावरील ड्रायव्हर ढाब्यावर पोलिसाने धाड टाकून संजय सिताराम गुळवे रा . सव याच्याकडून 2180 रुपयांची देशी दारू जप्त केलेली आहे . या पांच ही आरोपीविरुद्ध बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .