Home जळगाव निंभोरा पोलीस स्टेशन ला नूतन एपीआय स्वप्नील उन्नवणे यांनी पदभार स्वीकारला…

निंभोरा पोलीस स्टेशन ला नूतन एपीआय स्वप्नील उन्नवणे यांनी पदभार स्वीकारला…

47
0

रावेर (शरीफ शेख)
या बाबत अधिक माहिती अशी की,तत्कालीन स.पो.नि महेश जानकर यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची अहमदनगर येथे बदली झाली असून त्यांच्या रिक्त पदी एरंडोल पो.स्टे.चे सपोनि.स्वप्नील उन्नवणे यांची निंभोरा पो.स्टे बदली करण्यात आली असून त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला आहे.स्वप्नील उन्नवणे यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ची धुरा सांभाळताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत जनतेत समन्वय ठेवण्याची महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.सर्व सामान्य नागरिकांन मध्ये पोलीस दला विषयी आदर निर्माण करण्यासह,चोऱ्या,घरफोड्या ना आळा घालण्यासाठी रात्रीची प्रभावी गस्त तसेच अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलीस दलाचे कसोशीने प्रयत्न असतील.गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेल अशा पद्धतीने कामकाज करणार तसेच पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेले सर्व अवैध धंदे चालकावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले निंभोरा पोलीस ठाण्यात त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस स्टाफ तर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.