Home बुलडाणा रुग्णांचा खाजगी कोव्हिड सेंटर व शासकीय कोव्हिडं सेंटर बद्दल असलेला संभ्रम दूर...

रुग्णांचा खाजगी कोव्हिड सेंटर व शासकीय कोव्हिडं सेंटर बद्दल असलेला संभ्रम दूर करा

578

 

*रुग्णांचा हेडगेवार कोव्हिड सेंटर व अनुराधा कोव्हिड सेंटर बद्दल असलेला संभ्रम दूर करा*

प्रशांत पाटील

चिखली : तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असून बहुतांश रुघ्नांची आर्थिक परिस्थिती नसतांना देखील शासकीय कोव्हिड सेंटर कोणतं व खाजगी कोव्हिडं सेंटर कोणतं याची पुरेपूर माहिती नसल्याने व बहुतांश डॉ कडून खाजगी कोव्हिडं सेंटरलाच रुग्णांना रेफर केल्या जात असल्याचे दिसत आहे,
चिखली शहरातील अनुराधा कोव्हिडं सेंटर व हेडगेवार कोव्हिडं सेंटर असून सामान्य नागरिकांना दोन्ही ही कोव्हिड सेंटर हे शासकीयच असल्याचे वाटत असून तालुक्यातील बहुतांश डॉ देखील हेडगेवार कोव्हिडं सेंटरलाच रुग्णांना रेफर केल्या जात असून त्या ठिकाणी भरती झाल्यावरच रुग्णांना कळत की हे शासकीय कोव्हिडं सेंटर नसून खाजगी कोव्हिडं सेंटर आहे ,
नाईलाजास्तव घाबरलेल्या अवस्थेत सदर रुग्णांना इतरत्र न हलवता त्याच ठिकाणी उपचार घेण्याची वेळ त्यांच्या नातेवाईकांवर येत आहे व ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती लाखाच्या घरात खर्च करायची नसतांना देखील जिवाच्या भीती पोटी व खास करून माहितीच्या अभावे त्यांना शासकीय समजून खाजगी रुग्णालयातच उपचार घेतल्या जात असून बिलाच्या वेळी लाखो रुपयाच बिल बघून ते भरण्याची परिस्थिती नसल्याने काहींना नातेवाईकांकडून उसनवार किंवा काहींना वेळेवर खाजगी सवकारांकडून कर्ज काढून पैश्याची जुळवाजुळ करावी लागत आहे,भरोसा येतील एका रुग्णाला तर स्वतः चे राहते घर विकून सदर बिल रुग्णालयात भरण्याची वेळ आलेली आहे,
सदर खाजगी रुग्णालयातील खर्च हा सामान्य नागरिकांना परवडण्यासारखा नसून मोफत स्वाब तपासणी असतांना ही त्या ठिकाणी स्वाब नमुने तपासणी साठी १५०० ते १६०० आकारल्या जात असल्याचे रुग्णांकडून कळत आहे तसेच प्रती दिन रुग्णांना नर्स साठी १०००रु पी. पी. ई किट चार्ज, ४००० ते ५००० हजार बेड चार्ज व ऑक्सिजन इतर खर्च पकडला तर १० हजार रु प्रति दिन या प्रमाणे १२ ते १५ दिवस सदर रुग्णांवर उपचार केल्या जात असून लाखो रुपये तेही परिस्थिती नसतांना व केवळ फक्त माहितीच्या अभावाने व हेडगेवार कोव्हिड सेंटर व अनुराधा कोव्हिडं सेंटर हे दोन्ही ही शासकीयच कोव्हिड सेंटर असतील हा संभ्रम असल्याने आर्थिक परिस्थिती नसतांना व रुग्णांची तब्बेत स्थिर असतांना फक्त तज्ञांच्या देखरेखीखाली राहायचं म्हणून त्या ठिकाणी क्वारंटाईन म्हणून राहावं लागतं असल्याने सामान्य शेतकरी कष्टकरी मजूरदार रुग्ण मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र दिसत आहे व शासकीय कोव्हिड सेंटर सोडून अपुऱ्या माहिती अभावी इच्छा नसतांना देखील आर्थिक भुर्दंड सहन करत खाजगी कोव्हिड सेंटरला उपचार घेतल्या जात असल्याने रुग्णांनी शासकीय व खाजगी सेंटरची खात्री करून व आपली तब्बेत व आर्थिक परिस्थिती बघूनच योग्य ठिकाणी उपचार घ्यावे व तालुक्यातील डॉ बांधवांनी व आरोग्य क्षेत्रातील लोकांनी देखील रुग्णांची दिशाभूल न करता त्यांना योग्य ठिकाणीच रेफर करावं ही विनंती शेतकरी संघर्ष समितीचे सुभाष राजपूत, प्रशांत ढोरे पाटील,विनायक सरनाईक, नितिन राजपुत, अनिल वाकोडे, अनिल चव्हाण,मनोज जाधव,भारत जोगदंडे,सचिन पडघान,मनोज कटिकर आदींनी केली आहे.