विदर्भ

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आप ची मुख्यमंत्री यांना मागणी…!

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व सरकारी खरेदी सुरु करा – आम आदमी पार्टी ने केली मुख्यमंत्री यांना मागणी

 

राज्यात पावसाची सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आणि मोठ्या प्रमाणात
सोयाबीनची उगवण झाली नाही. याबाबत राज्यभर तक्रारी आल्यानंतर बियाणे व त्याच्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती आणि बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे उगवण शक्ती कमी होती, त्यामुळे शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली, हे सत्य आहे.

त्यानंतर अनेक भागात दुबार पेरणी झाली, सोयाबीन सोबतच मुग, उडीद हे पिके बऱ्यापैकी आले होते, परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वी खराब झालीत. विदर्भात व इतर भागात सोयाबीन वर येलो मोजाक नावाची कीड
आल्यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा भरल्याच नाहीत आणि ते सोयाबीन कापणीविना नागरणी करावी लागली, हे वास्तविकता आहे.

गेल्या महिन्यात जास्ती पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागातील कपाशीचे बोंड (पिक) सडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विदर्भातील संत्रा पिकाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मानव निर्मित पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली आली होती, तसेच गावातील नागरिकांच्या घरांचे
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही पूर्ण पणे मदत मिळालेली नाही. जेथे मिळाली ती फारच तुटपुंजी आहे. दुसरीकडे मागील दोन कर्जमाफीमध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफी झालेली नाही. एकूणच राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे सरकार कडून शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे, म्हणून आम आदमी पार्टी ने खालील मागण्या मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्या आहेत.

प्रमुख मागण्या –

१. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,

२. नुकसान झालेल्या पिकांसाठी प्रती हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे ५० हजार रुपये मदत जाहीर करावी

३. कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत,

४. सोयाबीन, धान व कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी (MSP नुसार सरकारी खरेदी चालू करावी)

५. पूर्व विदर्भात मानव निर्मित पूरामुळे झालेली नुकसान भरपाई कोकणात दिलेल्या मदती प्रमाणे देण्यात यावी.

६. राज्यात जेथे जेथे फळबागांचे नुकसान झाले आहे, तेथे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.

७. ज्या शेतकऱ्यांना मागच्या दोन कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्यांना कर्ज माफी देण्यात यावी.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून वरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात ही विनंती संपूर्ण राज्यतुन जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली. यावेळी स्थानिक शेतकरी व सजक नागरिक देखील उपस्तित होते.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752