Home विदर्भ कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

121

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता कोरपणा यथील युवा प्रतिष्ठाण हा ग्रुप विविध कार्यक्रम आयोजीत करुण युवाकांच्या सुप्त गुनांना वाव मिळावी ह्या उदात्त हेतूने युवकांना हक्काच व्यासपीठ म्हणुन युवा प्रतीष्ठाण ग्रुप कार्य करीत आहे.
समाजातील वंचीत युवकांना योग्य मार्गद्रर्शन मिळावे ह्या करीता युवा प्रतिष्ठाण वेळोवेळी युवकांच्या मदतीला धावुन जात आहे आज कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा करण्यात आले .
कार्यक्रमाचे उद्घाटण कोरपणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.गुरुनुले साहेब,यांनी केले कोरपणा येथील गुदेव मंडळाचे संघटक श्री.मिन्नाथजी पेटकर महाराज आजच्या लोकार्पण सोहळ्याल विषेश अतीथी म्हणुन उपस्थीत होते. या कार्यक्रमाला कोरपना शहरातील शेकडो युवकांनी हजेरी लावली होती युवकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आपल्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक युवकांना आपल्या जीवन घडवण्याचे प्रशिक्षण देत आहे तसेच बेरोजगार युवकांना रोजगार मिळविण्यासाठी प्रशिक्षण युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबव्हता येईल युवा प्रतिष्ठान युवक-युवतीं करिता सतत कार्य करीत असल्याचे मत कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुरनुले यांनी आपले मत व्यक्त केले या वेळेत तालुक्यातील युवकांचे युवा प्रतिष्ठान ला नेहमीच सहकार्य केले आहे युवकांना अनेक उद्योगाचे प्रशिक्षण युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करावा युवकांमध्ये अनेक गुण संपन्न आहेत ज्या युवकांमध्ये जे गुण आहेत दुर्गम भागातून नावलौकिक कशे मिळवायचे हाच युवा प्रतिष्ठान चा एक उद्देश कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेला युवा प्रतिष्ठान ग्रुप युवकांना सामाजिक कार्यक्रम राबवून या तालुक्यांचा महाराष्ट्रात नावलौकिक केल्याशिवाय राहणार नाहीत युवा प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहे असे मार्गदर्शन गुरनुले यांनी केले.