Home मराठवाडा बालमजुरी हि मुलांच्या विकासासाठी मोठा अडथळा

बालमजुरी हि मुलांच्या विकासासाठी मोठा अडथळा

196
0

बालमजूर आढळयास मालकावर व पालकावर गुन्हा नोंद करणार – कामगार अधिकारी कराड यांचा इशारा

 

जालना – लक्ष्मण बिलोरे

सध्या देशभरात कोरोना महामारीचे थैमान असल्यामुळे सर्व शाळा बंद आहेत.शाळकरी मुले ही घरी आहेत.या परिस्थितीत पालक मुलांना बेठबिगारी, हाॅटेल्स,खानावळी अशा अनेक दुकानांमध्ये कामाला ठेवत आहेत, असे जिल्हा कामगार अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष जालना चाईल्ड लाईन याच्या निदर्शनात आले आहे.त्यांनी आज एक गट तयार करून जुन्या मोंढ्यातील विविध कापड दुकान ,हाॅटेल्स्, गोडाऊन आदी ठिकाणी भेटी देऊन दुकानदार याना सुचना वजा इशारा दिला आहे. हाॅटेल, चहा टपरी ,भेळपुरीची गाडे या ठिकाणी बालकामगार कामाला ठेऊ नये, तसेच मुलांच्या अधिकारांना समजुन घ्यावे असे समजावले. बालमजुरी ही मुलांच्या विकासाला घातक आहे.हे पटवून दिले .जालना जिल्हातील बालमजुरी विरोधी लढ्यात सहभागी व्हावे, तसेच आपल्या स्वत:च्या घरात, सोसायटी टाॅवर मध्ये , कारखान्यात, दुकानात १८ वर्षांखालील मुलांना कामाला ठेवू नये, आपल्या आसपास कामावर ठेवलेल्या मुलामुलींचे कोणत्याही प्रकारचे शोषण होत असल्यास लगेच या बाबतची माहिती आपल्या शहरातील, जिल्ह्यातील बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष ,चाईल्ड यांच्याशी संपर्क करा, असेही आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिवाजी नागरे , टि ई कराड कामगार अधिकारी जालना यांनी केले आहे. सोबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एकनाथ राउत, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, गजानन इंगळे, विधी सल्लागार आनंद भिसे, सामजिक कार्यकतॅ संजय चव्हाण ,विनोद दाभाडे, समुउपदेशन सुरेखा सातपुते , अनिल लोखंडे चाईल्ड, लाईनप्रकल्प चे सागर सोनवणे, अनिता दाभाडे हे उपस्थित होते.