Home बुलडाणा जिल्हाधिकारी साहेबांच्या ताळेबंदी च्या आदेशाला तालुका प्रशासनाचा ठेंगा ?????

जिल्हाधिकारी साहेबांच्या ताळेबंदी च्या आदेशाला तालुका प्रशासनाचा ठेंगा ?????

226

 

आज देऊळगावराजा येथे गर्दीने उच्चांक गाठला ,

भरला होता आठवडी बाजार ,

रवी जाधव ,

देऊळगावराजा

करोना रोगाच्या पाश्वरभूमी वर नुकतेच जिल्हाधिकारी साहेब यांनी एक आदेश काढून दि , 31 ऑक्टोबर पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ताळेबंदी घोषित केली असून सामाजिक , सांस्कृतिक , कार्यक्रम आयोजित न करण्याचे व गर्दी न करण्याचे व नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत , मात्र आज येथे जिल्हाधिकारी साहेबांच्या ताळेबंदी आदेशाचे उल्लंघन झालेले दिसले येथे आज आठवडी बाजार भरला होता भरलेल्या बाजारात लोकांनी एकच गर्दी केली होती लोक खुलेआम विना मास्क खरेदी करतांना दिसत होते येथे सोशल डिस्टनसिंग ची ऐसी तैसी होतांना दिसत होती हे सर्व होत असतांना तालुका प्रशासन उघड्या डोळ्याने पाहून ही न पाहल्या सारखे करत होता , देऊलगावराजा व परिसरात करोना चे अनेक रुग्ण असून ते विविध रुग्णालयात उपचार घेत असून रोज येणाऱ्या शासकीय अहवालात तालुका आघाडीवर आहेत तर गेल्या काही दिवसां पासून येथे करोना ने थैमान घातले असून अनेक जण या जीवघेण्या आजाराच्या कचाट्यात सापडले आहेत असे असतांनाही तालुका प्रशासनाचे दुर्लक्षपना मूळे येथे करोना रुग्ण वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे , जिल्हाधिकारी यांच्या टाळेबंदी आदेशाचे खुलेआम उल्लंघन करणार्यांवर कार्यवाही कोन करणार ??? असा प्रश्न काही जाणकार लोक वयकत करीत आहे ,

देऊळगावमही येथे ही होणार उलंघन ???

रविवार ला तालुक्यातील मोठी बाजार पेठ असलेल्या देऊळगाव मही येथे सुद्धा आठवडी बाजार भरनार असल्याची माहिती मिळाली असून येथे सुध्दा जिल्हाधिकारी साहेबांच्या ताळेबंदी आदेशाचे उलंघन होणार आहे ,