Home बुलडाणा साखरखेर्डा येथील शिक्षक दाम्पत्यास लुटणारे जेरबंद ,

साखरखेर्डा येथील शिक्षक दाम्पत्यास लुटणारे जेरबंद ,

295

 

स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी ,

अमीन शाह

बुलडाणा ,

जिल्हयातील जबरी चोरी करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करणाच्या उददेशाने मा . पोलीस अधीक्षक , बुलडाणा श्री अरविंद चावरिया यानी स्थानिक गुन्हे शाखा . बुलडाणा यांना आदेशित केल . यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा , बुलडाणा यानी एक विषेश पथक तयार करून जिल्हयातील , जबरी चोरी गुन्हे उघडकिस आणण्याचे ठरविले . त्यावरून आज दिनांक १५/१०/२०२० रोजी गोपनिय माहिती मिळाली की . पोलीस स्टेशन अंढेरा येथील अप नं . २८ ९ २०२० कलम ३ ९ २ . ३४ भादवी प्रमाणे जबरी चोरी मधिल मुख्य आरोपी हा देऊळगांव राजा परीसरात वास्तव्यास आहे . यावरून पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने स्वतःचे नांव अरविंद लक्ष्मण शिदे वय २७ वर्ष रा . संजय नगर . देऊळगांव राजा असे सांगितले . त्याची कसुन विचारपुस केली असता आरोपीने पोलीस स्टेशन अंढेरा हददीतील मेरा खु . फाटा येथे एका शिक्षक दामपत्यास त्याचे साथिदारासह जिवे मारण्याची भिती दाखवुन लुटले होते . यावरून मुख्य आरोपी व त्याचे साथिदार संदिप प्रकाश गुराळकर वय २ ९ वर्ष विलास बबन सोळंके वय ३७ वर्ष दोन्ही रा . घानमोड ता . चिखली यांना ताब्यात घेतले . गुन्हयातील जबरीने चोरलेले सोन्याचे दागिने वर नमुद आरोपीनी चिखली येथील सराफा व्यावसायीक श्रीकृष्ण ज्वेलर्स बोंद्र काम्पलेक्स चे अजय भगवान वाळेकर रा . पुंडलिक नगर , चिखली यांना विकले यावरून त्यास सुदधा ताब्यात घेण्यात आले . वर नमुद आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेले दोन मोबाईल किमत १६.००० – तसेच गुन्हयात वापरलेले दोन मोटरसायकल ८०.००० -रू असा मुददेमाल तसेच आरोपी व सराफा व्यवसायीक यास पोलीस स्टेशन अंढेरा यांचे कडे पुढिल कायदेशिर कार्यवाही साठी ताब्यात देण्यात आले . सदर कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया , अपर पोलीस अधीक्षक डॉ . संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीय निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा . श्री महेंद्र देशमुख , स.पो.नि. नागेशकुमार चतरकर . पोउपनि मुकंद देशमुख , सहा.पानि अनिल भुयारी . पाना लक्ष्मण कटक , रधुनाथ जाधव , पोकॉ श्रीकांत चिचोल व इतरांनी केली ,

घटनाक्रम , ???

साखरखेर्डा येथील रहिवासी पालघर येथे शिक्षक असलेले समाधान भुसारी हे 25 अगस्ट रोजी आपल्या पत्नी सह मेरा खुद फाट्यावर घरी येण्यासाठी थांबले होते इतक्यात तिथे तीन अनोळखी आरोपींनी येऊन त्यांच्या पत्नी च्या गळ्यावर चाकू लावून लुटले होते त्या नंतर दुसऱ्या दिवशी समाधान भुसारी यांनी या लूट प्रकरणी अंधेरा पोलिसात तक्रार दाखल केली होती ,