Home विदर्भ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

144

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी

यवतमाळ – जिल्ह्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील नातेवाईकाला अंतिम संस्कार करताना अग्नि देण्यासाठी मोफत पी पी ई किट चे वाटप मनसेच्या वतीने करण्यात येत आहे .ज्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना पीपीई किट ची गरज भासेल त्यांनी मनसेकडे संपर्क साधावा सोबतच कोरोना च्या पार्श्वभूमीवर समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील लोकांसाठी पुन्हा एकदा मनसे सरसावली असून ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे अश्या कुटुंबातील व्यक्तीवर अंत्यसंस्कार साठीचा खर्च त्यात जलतन व इतर सर्व सामग्री मनसे तर्फे मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे.
मनसेने यापूर्वी आरोग्य विभागाला १००० पीपीई किट चे वाटप केले होते आता पुन्हा मनसेतर्फे आरोग्य विभाग , नगरपालिका प्रशासनाला पुन्हा पीपीई किट पुरविण्यात येणार आहे.मनसेने कोरोना काळात शेतकरी बांधवांना बियाणे वाटप, समाजातील गरजवंतांना धान्य वाटप, शहरातील दुर्गमभागात फवारणी सोबतच रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन यासह अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून आपली समजा प्रति बांधिलकी जोपासली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या भूमिकेचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून संपूर्ण लॉक डाउन ते आतापर्यंतच्या काळात मनसे समाजासाठी सदैव कटिबद्ध राहिली असुन यापुढेही आम्ही समाजासाठी बांधील राहू अशी ग्वाही मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी दिली.सोबतच संपर्कासाठी ९८५०३३४४८१, ९८२२४६०३८८ या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन मनसेने केले आहे.