Home महत्वाची बातमी मोर्शीत पोस्ट MDA सर्व्हेक्षण कार्यक्रम…!

मोर्शीत पोस्ट MDA सर्व्हेक्षण कार्यक्रम…!

121

अमरावती / मोर्शी – 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2020 या दरम्यान अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकाद्वारे पोस्ट MDA अंतर्गत 5 ते 9 वयोगटातील लहान मुलामुलींचे रक्तनमुने घेण्यात येत आहेत त्याचबरोबर डास संकलन व किटक सर्वेक्षण कार्यक्रम मा.सहायक संचालक डॉ.भंडारी सर (हिवताप व हत्तीरोग) व उपजिल्हा रुग्णालय मोर्शीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे दि.13 ऑक्टोबर रोजी या सर्वेक्षण मोहिमेला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी सर,जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर यांनी मोर्शी शहरातील वॉर्ड क्र.1 या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली व मार्गदर्शन करून चालू असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी वावरे सर,आरोग्य सहायक चोपकर सर,तांत्रिक विभागप्रमुख प्रकाश दातीर उपस्थित होते सर्वेक्षण करणाऱ्या टीममध्ये राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक मोर्शीचे आरोग्य सहायक विनायक नेवारे हिवताप विभागाचे आरोग्य कर्मचारी विनय शेलुरे,राधाकिसन वैद्य हत्तीरोग विभागाचे कर्मचारी सुधाकर कडू,प्रकाश मंगळे,मुरलीधर काळे,चंद्रसेन जाधव,राहुल भोसले हे आहेत व आरोग्य शिक्षण देऊन सर्वेक्षणाचे काम पाहत आहेत……..