Home परभणी गोपिचंदगडा वरील गोशाळेत लम्पि आजाराचे लसीकरण

गोपिचंदगडा वरील गोशाळेत लम्पि आजाराचे लसीकरण

160

गंगाखेड – तालुक्यातील पडेगाव येथील गोपीचंद गडावरील संत मोतीराम महाराज गोशाळेतील गाई व शिवारातील जनावरांना लम्पि या संसर्गजन्य आजाराचे प्रतिबंधक लसीकरण गुरुवारी पार पडले.

गोपिचंद गडावरील संत मोतीराम महाराज गोशाळेतील एका जनावरास लंबी सदर्श आजाराची लक्षणे दिसू लागली. येथील प्रगतशील शेतकरी मुकुंद बोबडे यांनी या जनावराचे फोटो काढून गंगाखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधन आयुक्त डॉ अली यांना दाखवले .डॉ फड ,डॉ आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ मिलिंद गायकवाड ,डॉ लवटे यांच्या सहकार्याने डॉ. संदीप खटिंग यांनी गोशाळेस भेट दिली. गोशाळेतील गाई व शिवारातील इतर जनावरांना ही प्रतिबंधक लस देण्यात आली. लसीकरण करण्यासाठी परिसरातील शेतकरी सोनबा बोबडे, संभाजी बोबडे, दिगंबर बोबडे परिश्रम घेतले. सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गोशाळेत जनावरांना लसीकरण करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांचे आभार मानले.