Home बुलडाणा एकलारा ग्रा पं चा अजब कारभार 60 हजार लिटरची केली फवारनि

एकलारा ग्रा पं चा अजब कारभार 60 हजार लिटरची केली फवारनि

100
0

 

सोडियम हैपो फवारणीच्या बाबतीत एकलारा ग्रा पं ने महानगरपालिकाला देखील मागे पाडले*

चिखली : शेतकरी संघर्ष समितीने कोरोना संक्रमन रोखण्यासाठी ग्रा. पं.नी केलेल्या साहित्य खरेदी विषयी माहिती मागवली असता एकलारा ग्रा पं ने सादर केलेल्या महितीत सहाशे लिटर सोडियम हैपो खरेदी केले असून एका लिटरला शंभर लिटर मिनरल वाटर वापरून फवारणी योग्य सोडियम हैपो तयार केल्या जाते त्याप्रमाणे सदर ग्रा पं ने 60,000 लिटरची फवारणी केल्याचे समोर आले आहे,
एखादया महानगर पालिकेला ही लाजवेल इतक्या मोठ्या प्रमाणात तेही एकलाऱ्या सारख्या ग्रा पं ने फवारणी करणे खरंच शक्य आहे का??कुठेतरी चुकीचे व अवास्तव बिल सादर करून सरकारी तिजोरीवर राजरोज पणे डाकाच टाकण्याचा हा प्रकार म्हणावे लागेल ,अशी चुकीची व अवास्तव माहिती सादर करून संबंधीत सचिवांने गटविकास अधिकारी यांच्या डोळ्यात धूळ फेकलेली असल्याचे निदर्शनात येत आहे तरीदेखील गटविकास अधिकारी चौकशी करण्यास का असमर्थ ठरत आहेत हे कळायला देखील मार्ग नाही जाणून बुजून चौकशीला का विलंब केल्या जात आहे?? कुठेतरी झालेला अपहार लपवण्यासाठी सारवासारव करण्यास अप्रत्यक्षपणे वेळ दिल्या जात असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे प्रशांत ढोरे पाटील,विनायक सरनाईक,नितीन राजपूत,भरत जोगदंड, मनोज जाधव यांनी केला आहे ,
गैर व्यवहार किती करावा कुठे करावा याला ही यांच्यात काही मर्यादा असतीलच, इतके ही करून आम्ही ठाम पणे सांगू शकतो की सदर ग्रा पं ने एक रुपयाचं देखील सोडियम हैपो खरेदी केलेलं नसून ब्लिचिंग पावडर ची ती ही थातुरमातुरच फवारणी केलेली आहे व ज्या वेळेस शेतकरी संघर्ष समितीने अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा घेतल्या गेला त्या दिवशी रातो रात नाशिक येथील बनावट अनॅलिसीसी रिपोर्ट जोडुन माहितीसाठी रिपोर्ट सादर करण्यात आला व वेळ मारून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला आहे, कुठेतरी ग्रामसेवकांचे नेते असल्याने प्राशकीय आधिकारी देखील सदर सचिवांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत आहे,संबंधीत ग्रामसेवक यांच्या कडे शिंदी हराळी हे देखील गाव असून त्या ठिकाणी ही दीडशे इन टू शंभर प्रमाणे 15000 लिटरची फवारणी केल्याचे कागदोपत्री सिद्ध होत आहे, तसेच मालगनी येथील सचिवांनी फक्त सोडियम हैपो चीच खरेदी केली असल्याचे सांगून इतर काहीही खरेदी केलेले नाही,साकेगाव येथे वाढीव किंमतीचे सॅनिटायझर खरेदी दाखवून इतर ही अवास्तव बिल जोडलेले आहेत,नायगाव मध्ये फक्त इन्फ्रारेड थर्मोमिटर गण व्यतिरिक्त काहीही खरेदी केले नसल्याचे स्पष्ट होत आहे,मलगी येथे ही फक्त फवारणी केली आहे, हातनी ग्रा पं ने देखील आधी 140 रुपये खरेदी चे सॅनिटायझर बिल लावणार असतांना आपली तक्रार झाली असल्याने जे सॅनिटायझर 18 रुपये दराचे आहे त्याच कँम्पणीचे त्याच बॅच नं चे सॅनिटायझर 62.88 ने खरेदी केल्याचे दाखवले आहे व आजवर त्यांनी कुठली ही फवारणी केली नसल्याचे कागदोपत्री दाखवलेले आहे,मेरा खु ,बेराळा येथे देखील तीच परिस्थिती आहे,पळसखेड दौलत येथे तर मुदत बाह्य होण्यावर थोडाच अवधी असलेले हॅन्ड वाश वाटप करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केलेला असतांना सदर खरेदी बिल जोडलेले नसून सदर खर्च सचिवांनी खिशातून खर्च करून उदारता दाखवून दिलेली आहे व बॅनर,फवारणीसाठीचेच बिल काढलेले आहेत व फवारणी साठी लागलेले कुठलेही साहित्य खरेदी केलेले नसल्याचे दिसत आहे व प्रोत्साहन पर मानधन खर्च केल्याचे दाखवले आहे ,चांधई येथे तर कोरोना रुघ्न सापडून देखील एक रुपयांची ही कोरोना संक्रमन रोखण्यासाठी खरेदी केलेली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे,कोलारा येथे देखील फक्त फवारणी करून एकलाऱ्या खालोखाल कारभार असल्याचे बिल सादर केलेले आहेत,धानोरा ,वरखेड काटोडा ,शेलोडी येथे देखील फक्त फवारणीच केलेली असल्याचे बिल सादर केलेले आहेत,वळती सवना,चंदनपूर, कवठळ येथिल सचिवांनी बऱ्या पैकी बिल जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केलेला आहे व करवंड, कव्हळा सचिवांनी कुठली ही माहिती दिलेली नाही अश्या प्रकारे सदर ग्रा पं नि अपूर्ण माहिती सादर करून दाल मे कूच काल ला ही है प्रमाणे साहित्य खरेदीत अपहार केल्याचे सिद्ध होत असल्याने सदर ग्रा पं सचिवांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा शेतकरी संघर्ष समिती तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले,