Home विदर्भ यवतमाळ जिल्हाच्या इतिहासात प्रथमच विविध क्षेत्रातील अधिकारी जिल्हाधिकारी‌ यांच्या विरोधात…!

यवतमाळ जिल्हाच्या इतिहासात प्रथमच विविध क्षेत्रातील अधिकारी जिल्हाधिकारी‌ यांच्या विरोधात…!

866

विनोद पञे

यवतमाळ , दि.३० :-  यवतमाळ येथील जिल्हाधिकारी व डॉक्टर यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता डॉक्टरांनी जिल्हाधिकारी यांना यवतमाळ वरून हटवण्यासाठी आंदोलन छेडले असून डॉक्टरांनी केलेली ही चळवळ फार कठीण आहे . यवतमाळ तहसीलदार , मुख्याधिकारी , बीडीओ तसेच अनेक शासकीय संघटनांचे सहकार्य या डॉक्टरांना केले जात आहे. यामुळे ही गोष्ट आता जोर धरू लागली आहे. हे सर्वजण जिल्हाधिकारी यांना हटविण्याची मागणी करत आहेत. जिल्हाधिकारी यांना हटविण्यासाठी सर्वच कामावर येणार नाहीत. तसेच 89 डॉक्टरांनी राजीनामा दिला होता परंतु आज मंगळवार रोजी ही संख्या 135 वरती पोहचली आहे.
यवतमाळ जिल्हातील सर्व विभागाने म्हटले आहे की जिल्हाधिकारी यांनी अनेकदा अमचा अपमान केला आहे व नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे असे अधिकारी एकमेकांना व लोकांना सांगत आहे , ज्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यापूर्वी एसडीओ आणि तहसीलदार मार्फत आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते अशीही चर्चा , परंतु अद्यापपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच आयुक्तांना भेटण्यासाठी काल एक अधिकारी अमरावती येथे गेला. जिल्हाधिकारी यांनी विविध क्षेत्रात कार्यरत डॉक्टर आणि अधिकारी त्यांच्या जवळचे आहे असेही बोलल्या ‌जात आहे.
यवतमाळ जिल्हाधिकारी व डॉक्टर यांच्यात काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे‌ यात सामान्य व‌ गरीब लोकांचे मरण दिसून येत आहेत.‌