Home विदर्भ घरफोडी करणारा सरहाईत चोरटा गजाआड , चोरीचे एकुण २२ गुन्हे आणले...

घरफोडी करणारा सरहाईत चोरटा गजाआड , चोरीचे एकुण २२ गुन्हे आणले उघडकीस…!

323

१४ लाख ४५ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

रवि माळवी

यवतमाळ , दि. १० :- जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, उमरखेड, दारव्हा, आर्णी, महागांव, कळंब इत्यादी ठिकाणी स:हाईत चोरट्याने दिवसा व रात्री घरफोड्या करुन एकुण १४ लाख ४५ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल चोरी केला होता. यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून स:हाईत चोरट्यास दिनांक ४ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान पुसद येथून अटक केली. पोलीसांनी ही कार्यवाही वाशिम ते पुसद मार्गावरील भोजला टि पॉईन्ट जवळ केली.
फिरोजखान उर्फ रंडो साहेबखान (२९) रा. तुकारामबापु वार्ड, पुसद असे स:हाईत चोरट्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी घडलेल्या घरफोड्या तात्काळ उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांना आदेशीत करुन विशेष पथक स्थापण करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांचे पथकातील कर्मचारी यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.
पोलीस उपनिरीक्षक शेळके व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांचे विशेष पथक मागील काही दिवसांपासून गुन्हेगाराचा मागोवा घेण्याकरीता प्रयत्न करीत असतांना फिरोजखान उर्फ रंडो साहेबखान हा पांढ:या रंगाच्या हिरो मेस्ट्रो कंपनीचे स्कुटी वाहनाने दिनांक ४ जानेवारी रोजी वाशीम मार्गे पुसद येथे सोन्या चांदीचे दागीने विक्री करीता येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेकडील विशेष पथकाने पुसद येथील भोजना टि पॉईन्ट जवळ सापळा रचुन ४ ते ५ वाजताच्या सुमारास त्याला अटक केली. पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये १२ ग्रॉम सोन्याचे दागीने तसेच रोख १ हजार ७५० रुपये मिळून आल्याने जप्त करुन त्यास विश्वासात घेवून सदरचे दागीने व रोख रक्कमेबद्दल सखोल चौकशी केली असता त्याने वसंतनगर, पुसद मैनाबाई नगर विठाळा वार्ड येथील एका घरातुन चोरी केली असल्याचे सांगीतले. सदर चोरी प्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशन येथे अप.क्र. १०३/१९ भादंवि कलम ४५४, ३८० गुन्ह्यात त्यास अटक करुन सदरचा गुन्हा विशेष पथकाने स्वत: तपासावर घेवून नमुद आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, उमरखेड, दारव्हा, आर्णी, महागांव, कळंब ईत्यादी ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली देवून त्याने केलेल्या चोरीमधील मुद्देमाल हैद्राबाद व चिखली जि.बुलढाणा येथील त्याचे भाड्याने असलेल्या घरी ठेवला असल्याचे सांगीतल्याने पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांचे विशेष पथकाने हैद्राबाद व चिखली येथून २९७ ग्रॅाम सोन्याचे दागीने व २४००ग्रॉम वजनाचे चांदीचे दागीने असा मुद्देमाल जप्त करुन यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहर पोलीस स्टेशन, अवधुतवाडी, वसंतनगर, आर्णी, महागांव, कळंब, दारव्हा, उमरखेड, दिग्रस येथील दिवसा व रात्री घरफोडीचे एकुण २२ गुन्हे उघडकीस आणले.
पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके व पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार यांचे विशेष पथकाने स:हाईत घरफोडी करणा:या चोरट्या आरोपीस अटक करुन त्याचेकडून ३०९ ग्रॉम सोन्याचे दागीने, २४०० ग्रॉम चांदीचे दागीने व नगदी १ हजार ७५० तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन हिरो मेस्ट्रो कंपनीची स्कुटी असा एकुण १४ लाख ४५ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाज हस्तगत केला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधिक्षक नूरूल हसन, पुसद उपविभाग येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक अनुराग जैन, यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस हवालदार गोपाल वास्टर, गजानन डोंगरे, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, मो.ताज, किशोर झेंडेकर, दिगांबर पिलावण, नागेश वास्टर, पंकज बेले, प्रविण कुथे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी पार पाडली.