Home बुलडाणा कलेक्टर,एस.पी.च्या आदेशानंतरही रेशन धान्य साठ्यावर छापा फेल,देऊळघाट येथील रेशन तस्करा सह घर...

कलेक्टर,एस.पी.च्या आदेशानंतरही रेशन धान्य साठ्यावर छापा फेल,देऊळघाट येथील रेशन तस्करा सह घर मालकावर गुन्हा दाखल

198

कलेक्टर,एस.पी.च्या आदेशानंतरही रेशन धान्य साठ्यावर छापा फेल,देऊळघाट येथील रेशन तस्करा सह घर मालकावर गुन्हा दाखल

दोन्ही पथक पोहोचण्या पूर्वीच तांदूळ साठा गायब

2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा – 6 सेप्टेंबर

बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील ग्राम दहीद बु. येथील एका घरात रेशनचा तांदूळ अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहीती मिळाल्याने छापा टाकण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या पथकांना रिकाम्या हाती परतावे लागल्याची घटना 4 सप्टेंबरला रात्री घडली आहे, मात्र 2 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलडाणा तालुक्यातील मौजे दहीद बु.येथे कैलास जगदेव जाधव यांच्या मालकीच्या घरात रेशनचा अवैध धान्यसाठा असल्याची माहीती मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा पोलिस अधिक्षकांनी गठीत केलेले महसूलचे पथक व पोलिस पथक काल शुक्रवारी रात्री घटनास्थळी हजर झाले. मात्र या दोन्ही पथकांच्या पोहोचण्यापूर्वीच सदर घरातून ठेवलेला अवैध रेशन धान्यचा साठा तस्कराने इतर ठिकाणी हलविल्याचे घटनास्थळावर विखूरलेल्या तांदूळामूळे स्पष्ट झाले. त्या ठिकाणी केवळ रिकाम्या गोण्या व अर्धा कट्टा तांदूळ मिळून आला आहे. दरम्यान घरमालक कैलास जाधव याला पोलिसी खाक्या दाखविल्याने त्याने सदरचा 12 क्विंटल रेशनचा तांदूळ किंमत 30 हजार रु. मुख्य आरोपी देऊळघाट येथील ईस्माइल खान याने काल 4 सप्टेंबरला दुपारी 3 ते 4 वाजता आणल्याचे व एका पिकअप वाहनाने रात्री 10.30 वाजता घेऊन गेल्याची कबूली दिली आहे.कैलास जाधव यांनी आपले घर ईस्माईल याला 5 हजार रुपये भाड्याने दिलेला आहे. या प्रकरणी बुलडाणा तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी अमरसिंह पवार यांच्या फिर्यादी वरुन आरोपी ईस्माइल खान रा. देऊळघाट व कैलास जगदेव जाधव रा. दहीद बु. यांचे विरुध्द जिवनावश्यक वस्तू अधिनियमची कलम 3,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित होत आहे. छापा टाकण्यापूर्वीच धान्यसाठा गायब झाला कसा? आरोपीला तात्काळ धान्य उचलण्याची माहिती कुणी दिली? सध्या हे प्रश्न अनुत्तरीत आहे.प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर करीत आहे.अद्याप एक ही आरोपी अटक करण्यात आलेला नाही.