Home बुलडाणा मलकापूर पांग्रा येथे आढळले  तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मलकापूर पांग्रा येथे आढळले  तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

289

 

प्रशासनाची लापरवाहि ,

 

मलकापूर पांग्रा परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या 30 च्या पुढे

फकिरा पठाण ,

दिवसेंदिवस करोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने अगोदरच मलकापूर पांग्रा येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र मलकापूर पांग्रा येथे पुन्हा 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जनसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे मात्र प्रशासनाच्या लापर वाही मूळे येथे मोठ्या प्रमाणात करोना पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून तालुका प्रशासनच्या वतीने येथे ज्या भागात करोना पोझेटिव्ह रुग्ण सापडले तो भाग सील करण्यात न आल्या मूळे व त्या भागात लोकांची एकच गर्दी होत आहे कोणतेही सील करण्यात आलेले नाही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून तीन दिवस झाले ग्रामपंचायत च्या वतीने येथे उपाय योजना केल्या जात असून लोकांत जण जागृती केली जात आहे गावात साफ सफाई व जंतुनाशक औषधीची फवारणी करण्यात आली मात्र गावातील एकाच घरातील तीन पॉझिटिव सापडले असून ते जालना येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे शासनाच्या प्रोटोकॉल नुसार एरिया सील करण्याची पद्धत बंद झाली की काय असा खडा सवाल गावातील नागरिकांमध्ये होत आहे
ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तेथे एसबीआय बँक मेडिकल व खाजगी दवाखाने व इतर दुकाने असून ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिवसभर वर्दळ असते ती सुरूच असून एरिया सिल न करण्यात आल्याने पॉझिटिव रुग्णांचा धोका वाढला आहे तसेच गावात संशयित रुग्ण राहत्या घरीच उपचार घेत असल्याच्या चर्चेला ही उधाण आले आहे मात्र प्रशासनाच्या वतीने बॅरिकेट अथवा एरिया सील करण्यात न आल्याने कोरणा संसर्गाची भीती वाढत आहे ,

ज्या जवळच्या ग्रामीण भागात सध्या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात रोज मलकापूर येथे येत आहे येथे येणारे लोक हे निययम पाळत नसल्याचे व सोशल डिस्टनसिंग ची ऐसी तैसी होत आहे त्या मूळे मलकापूर येथे मोठ्या प्रमाणात करोना पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे , येथील एकमेव असलेल्या स्टेट बँकेत ही सोशल डिस्टनसिंग चा निययम पाळला जात नसल्याचे दिसत आहे , जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने या गावा कडे लक्ष देऊन उपाय योजना कराव्यात अशी मंगणी येथील काही नागरिक करीत आहे ,