Home बुलडाणा विळयाने वार करून नातवाने आजीलाच मारून टाकले ,

विळयाने वार करून नातवाने आजीलाच मारून टाकले ,

715

 

खळबळजनक घटना ,

अमीन शाह ,

बुलडाणा ,

विळ्याचे वार करून आजीचा निघृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना लोणार तालुक्यातील खुरामपूर येथे आज सकाळी उघडकीस आली . पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि संशयावरून नातवाला ताब्यात घेतले आहे . त्याला सध्या पोलीस ठाण्यात बसवले असून , उत्तरीय तपासणी अहवाल आल्या नंतर नातवावर पुढील कारवाई केली जाईल , असे तपास अधिकाऱ्यांनि सांगितले . लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे ( 65 ) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे . दारूसाठी पैशाची मागणी करत आजीवर नातवानेच विळ्याचे वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे . पोलिसांनी नातू नामदेव नागरे 24 याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे . घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली असून या खुनाचा तपास ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक श्री . अजहर शेख करत आहेत .