Home नांदेड सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर किर्तीकिरणकुमार एच. पुजार यांनी...

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर किर्तीकिरणकुमार एच. पुजार यांनी गतिमान प्रशासनासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

180

मजहर शेख

नांदेड / किनवट, दि. ३ :- किर्तीकिरणकुमार एच. पूजार, भाप्रसे यांनी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारीपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, गणेश विसर्जन स्थळ पाहणी व नगरपालिकेतील सहविचार सभेस उपस्थित राहून गतिमान प्रशासनासाठी आपण कटिबद्ध आहोत हेच दाखवून दिले आहे.
सकाळीच उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकिरणकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. येथे उपचार घेणाऱ्या बाधित रुग्णांसाठीच्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली. स्वॅब घेण्याची जागा बदलावी, तसेच या कक्षात ये -जा करणाऱ्यांच्या संगणकीय नोंदी ठेवाव्या व एकच प्रवेशद्वार ठेवावे अशा सूचना त्यांनी दिल्या. वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार उत्तम कागणे, डॉ. झुबेरी, डॉ. रामचंद्र ढोले, डॉ. दत्ता केंद्रे, डॉ.आर.जी. बोडके उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी नगरपालिकेतील नागरिकांच्या सहविचार सभेत हजेरी लावली. तदोप्रांत पैनगंगा नदी तीरावरील गणेश विसर्जन स्थळाची त्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी मुख्याधिकारी निलेश सुंकेवार व लक्ष्मीकांत ओबरे उपस्थित होते.

आमदार केरामांसह अनेकांनी केले त्यांचे स्वागत

उप विभागीय अधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर आमदार भीमराव केराम व भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी शाल, पुष्पगुच्छ व रेणुकामाता प्रतिमा देऊन किर्तीकिरणकुमार यांचे स्वागत केले. किनवट – माहूर उप विभागातील महत्वाच्या विकासकामाबाबत चर्चा केली.
त्यानंतर गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने व कोरोना कक्ष तालुका मीडिया समन्वय अधिकारी उत्तम कानिंदे यांनी कमळ पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ऑनलाईन शिक्षण व सध्यास्थिती यावर चर्चा केली. तसेच स्थानिक भाषेत गीत, संगीताच्या माध्यमातून शिक्षक कलावंता मार्फत शैक्षणिक पाठ्यांश तयार करून सर्व विद्यार्थ्यांपर्यत कसे पोहचविता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
अधिस्विकृतीधारक पत्रकार साजिद बडगुजर यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, वास्तव बातम्यांची आम्ही पाठराखण करू परंतु काल्पनिक, खोट्या व फेक न्यूज आम्हाला मुळीच रुचणार नाहीत.