Home पश्चिम महाराष्ट्र ..अणखी एका उमद्या पत्रकाराचा बळी. पुण्यातील टी व्ही 9 वृत्तवाहीनीचे रिपोर्टर पांडुरंग...

..अणखी एका उमद्या पत्रकाराचा बळी. पुण्यातील टी व्ही 9 वृत्तवाहीनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे करोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या जम्बो रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाल्याची दु:खद घटना घडली.

200

 रवि गवळी

पुण्यातील टीव्ही 9 या वृत्त वाहिनीचे पांडुरंग रायकर यांनी मुळ गावी कोपरगावला, जाण्यापूर्वी अँटीजन टेस्ट केली होती. ती निगेटिव्ह आल्यानंतर विश्रांतीसाठी गावी गेले होते. मात्र गावीच तब्येत बिघडली, स्वॅब टेस्ट केल्यावर पोझिटिव्ह आली. कोपरगावच्या एका रुग्णालयाने (नाव समजू शकले नाही) 40 हजार रुपये अगोदर भरण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी थोडा विचार करून, पुण्यातील जम्बो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले. उपचार सुरू झाल्यावर त्यांची प्रकृती खालावत गेली. ऑक्सिजन लेवल 80 वर होती. ही चिंतेची बाब असल्याने पुण्यातील पत्रकार मित्रांनी काल दिवसभर अनेक रुग्णालय व्यवस्थापन सोबत बोलून व्हेंटिलेटर्स बेड यासाठी प्रयत्न केले. त्याच वेळी काही प्रमाणात म्हणजे 85 पर्यंत ऑक्सिजन लेवल गेली. त्यामुळे थोडीशी समाधानाची बाब होती. हळूहळू ऑक्सिजन लेवल वाढेल असे सर्वांना वाटत होते. तेवढ्यात संध्याकाळी एका रुग्णालयात बेड उपलब्ध झाला. मात्र तिथे दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही. जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. काही मिनिटांपूर्वी जम्बो रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले की, पांडुरंग यांची ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांच निधन झाले. एवढे प्रयत्न करून आणि दररोज करोनाच्या बातम्या करून आपल्या सहकाऱ्याला वाचवू शकलो नाही याची खंत सर्व पत्रकारांच्या मनात आहे. पांडुरंग रायकर यांनी मागील सहा महिन्यात करोनाच्या असंख्य बातम्या केल्या. त्यामध्ये सीईओपी मैदानावर जम्बो रुग्णालय बातमीचाही देखील समावेश होता. त्याच रुग्णालयात मृत्यूला सामोरे जाण्याची वेळी आली. प्रसार माध्यम पत्रकार प्रशासनाने नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत. अशी मागणी करीत असतो. मात्र याच व्यवस्थेचा कोरोना काळात पत्रकार बळी जात आहेत.

मराठवाड्यातील, लातूर चे गंगाधर सोमवंशी,बीडचे संतोष भोसले यांच्या पाठोपाठ आता अनखी एक उमद्या पत्रकार बळी ठरला.कोरोनात मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुंटूबाला घोषणा करुन ही सरकारची मदत करण्याची भावना नाही आणि पत्रकारांनाही योग्य उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत असल्याने प्रसंड संताप व्यक्त होत आहे.त्यामुळे माध्यम क्षेत्रातील मान्यवरांना याबाबत ठोस भूमिका घ्यावी लागेल तरच परिस्थिती बदलेल अन्यथा अनेक पांडुरंग बळी ठरतील.
मयत पत्रकार पांडुरंग रायकर यांना पत्रकार संरक्षण समिती वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!