Home विदर्भ यवतमाळ जिल्हा क्रिडा संकुल येथील शरीर – सौष्ठवसाठी घेण्यात येणारे शुल्क थांबवा

यवतमाळ जिल्हा क्रिडा संकुल येथील शरीर – सौष्ठवसाठी घेण्यात येणारे शुल्क थांबवा

189

जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर

यवतमाळ‌ – येथील स्थानिक जिल्हा क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणार्या जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानाचा लिलाव करुन त्या मैदानावर शरीरसौष्ठव करण्यासाठी ज्या प्रकारची शुल्क वसुली करण्याचे काम एक तारखेपासून सुरु होत आहे ते अत्यंत निंदनीय असून तात्काळ थांबविण्यात यावे. जेणेकरुन घटनादत्त अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सदरील मैदानाचा उपयोग घेता येईल. एकीकडे शासनाच्या वतीने मोठमोठे धिंडोरे पिटले जातात की देशातील प्रत्येक व्यक्तीने निरोगी राहून आरोग्य टिकविण्यासाठी व्यायाम केला पाहिजे व दुसरीकडे अशा प्रकारचे आरोग्य टिकविण्यासाठी उपलब्ध केल्या गेलेल्या मैदानावर पैशाची आकारणी करण्याचे काम शासकीय स्तरावर केले जात आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या उद्दीष्टाची अवहेलना झाल्यासारखे वाटते. शासनाच्या दुटप्पी धोरणाचा विरोध करणे हा या निवेदनाचा विषय असून जनतेचे आरोग्य टिकविण्साठी तयार करण्यात आलेल्या या मैदानाचा वापर विनाशुल्क असावा अशी मागणी सुध्दा या निवेदनाव्दारे करण्यात येत आहे. दुसरा हेतू असा सुध्दा आहे की शेवटच्या गरीब घटकांना सुध्दा या मैदानाचा वापर करायला मुभा मिळावी आणि आजच्या परिस्थितीत समाजातील शेवटचा घटक कोरोणा महामारीच्या संकटात आर्थिक दृष्ट्या ढासळलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून मैदानाची फी भरणे शक्य होतांना दिसून येत नाही. तसेही क्रिडा विभगाात महसूल निर्माण करणे हा शासनाचा उद्देश असू शकत नाही. त्यामुळे सदरील निविदा रद्द करुन मैदान पुर्णपणे विनाशुल्क असावे हीसुध्दा विनंती या निवेदनाचा विषय आहे. क्रीडा विभागाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात गरीब समाजातील मुले सुध्दा अपले भविष्य आजमवण्या करीता मोठ्या प्रमाणात विविध खेळांमध्ये सराव करण्यासाठी येत असतात. आज त्यांच्याकडे खायला सुध्दा पुरेसे अन्न उपलब्ध होत नाही. अशा परिस्थतीत मैदानावर आकरण्यात आलेले शुल्क सदरील खेळाडू भरण्यास असमर्थ आहे. मग अशा खेळाडूंनी आरोग्य टिकविण्यासाठी कुठे जायचे असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या समस्त प्रश्नांचे एकच उत्तर आणी ते म्हणजे मैदानचाा विनाशुल्क वापर करण्याची पारवानगी व शुल्क आकारणीर निवीदा रद्द करणे होय. याकरीता गरीब खेळाडूंच्या हिताचा निर्णय जिल्हाधिकारी साहेबांनी घेवून होणारा प्रकार थांबवावा याकरीता निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी अॅड. दिग्वीजय गायकवाड, उमेश मेश्राम, प्रविण रापर्तीवार, आनंद शेलार, बंडू गुप्ते, प्रितम शहाडे, अविनाश गुल्हाणे, कौशिक कारीया, कल्पेश कारीया, अक्षय शहाडे, रोशन जयस्वाल आदींची उपस्थिती होती.