Home जळगाव ३ वर्षापुर्वी डोक्यावर परीणाम झाल्याने परीवारापासुन अलिप्त झालेल्या रामकुमारला पोलीसांचा मदतीने केले...

३ वर्षापुर्वी डोक्यावर परीणाम झाल्याने परीवारापासुन अलिप्त झालेल्या रामकुमारला पोलीसांचा मदतीने केले परीवाराचा स्वाधीन

196

फैजपुरात माणुसकीचे दर्शन घडवणारी हाजी बांधवाची कौतुकास्पद कामगिरी

शरीफ शेख

रावेर , दि. ०७ :- फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत फैजपूर शहरात रामकुमार हेमराज यादव वय ५७ वर्ष रा बभणपूरा कप्तानगंज पोलिस स्टेशन, ता. जि. आजमगड (उत्तर प्रदेश) हा सरकारी नोकरीत महसूल विभागात नोकरीस असतांना सुमारे ३ वर्षापुर्वी अचानक डोक्यावर परीणाम झाल्याने ते घर सोडून निघून गेले होते व ते सुमारे ४ महीने पासून फैजपूर व सावदा परिसरात पायी पायी चालत असायचे त्या दरम्यान फैजपूर शहरातील हाजी शेख खलिल शेख करिम व हाजी नाशिर शे करिम यांना भेटले यांच्या कडे सुमारे एक महिन्या पासून तो येत जात होता तेव्हा त्यांनी त्यांची वेळो वेळी जेवणाची व्यवस्था केली व त्यांना नाव गाव विचारले तेंव्हा त्यांनी त्याच नाव सांगितल्याने दोन्ही हाजी बांधवांनी यांनी लागलीच स्थानिक पोलिस स्टेशनचे API प्रकाश वानखडे, ASI विजय पाचपोळे, पोहेकॉ इकबाल सैय्यद, पोकॉ अमजद पठाण, पोकॉ उमेश चौधरी, अश्यानी सदर इसमास विश्वासात घेऊन विचारपूस करीत त्याचे नातेवाईक व पत्त्याची विचारणा केली व त्या वरुण सदर ठिकाणचे पोलिस स्टेशन संपर्क साधला व त्यांचे हद्दीतील बभणगाव येथील सरपंच श्री रामदशरथ यादव याचा मोबाईल फोन नं प्राप्त करुण व्हाटसॲप व्दारे सदर इसमाची माहीती देऊन व फोटो टाकूण ओळख पटवली व त्यांचे नातेवाईक यांना मा उप विभागीय पोलिस अधिकारी श्री नरेंद्र पिंगळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे नातेवाईक श्रावण यादव यांचे ताब्यात देऊन नातेवाईक यांचे स्वाधीन केले आहे.