महत्वाची बातमी

ना. संजय राठोड यांनी स्वीकारला मदत व पुनर्वसन विभागाचा पदभार

Advertisements

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुंबई , दि. ०७ :- महाविकास आघाडी सरकारमधील जिल्ह्यातील एकमेव कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनी आज मंगळवारी दुपारी मंत्रालय, मुंबई येथे मदत व पुनर्वसन विभागाचा पदभार स्वीकारून आढावा घेतला.

मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, सहसचिव श्यामसुंदर पाटील यांनी ना. संजय राठोड यांचे स्वागत केले.
पदभार स्वीकारताच ना. राठोड यांनी मंत्रालय परिषद सभागृहात मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सखोल आढावा घेतला. यावेळी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या कामकाजाची माहिती त्यांनी घेतली. राज्यातील काही भागात सध्या उद्भवलेली पावसाळी परिस्थिती, गेल्या आठवड्यात राज्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेले नुकसान याबाबतही माहिती जाणून घेतली. कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाने कायम सतर्क राहणे, ही सर्वात महत्वाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले.

बैठकीला उपसचिव सुभाष उमराणीकर, उपसचिव बनकर, अवर सचिव घोलप, श्रीदत्त कामत व विभागाचे इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.

You may also like

मुंबई

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांना डेमोक्रॅटिक आरपीआय व सम्यक पँथर चा औकातीत राहण्याचा इशारा.

मुंबई ,  (प्रतिनिधी) – बहुजन हृदयसम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणनार्यांनी आपल्या ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...