Home विदर्भ मोबाईल दाखवण्याचे अमिष देऊन सहा वर्षीय चिमुकली वर नराधमांने केला अत्याचार

मोबाईल दाखवण्याचे अमिष देऊन सहा वर्षीय चिमुकली वर नराधमांने केला अत्याचार

43
0

लोकात संताप , “आरोपी अटक “

अमीन शाह

अमरावती , दि. ०७ :- धामणगाव शहरात काल घडलेल्या खुनी थरार च्या घटने नंतर पुन्हा आज माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे एका नराधमांने मोबाईल दाखवण्याचं अमिष देऊन सहा वर्षीय चिमुकली वर अत्याचार केल्याची घटना घडली आहे घडलेल्या घटने मुळे लोकात संताप वयकत केला जात असून आरोपी ला कडक शिक्षा देण्यात यावी या साठी मोठा जमाव पोलीस स्टेशन ला दिसून आला .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार दत्तापुर पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या धामणगाव येथील आरोपी नागेश नंदलाल कुरील 21 याने एका सहा वर्षीय चिमुकलीस मोबाईल दाखविण्यासाठी जवळ बोलवले दुपार ची वेळ असल्याने सर्वत्र शुक शुकाट होता हीच संधी साधून या युवकाने त्या चिमुकली सोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला ही बाब पीडित मुली ने आपल्या आई वडिलांना सांगितली देण्यात आलेल्या तक्रारी वरून दत्तापुर पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्याच्यावर भा, द , वि , 376, 377 , बाल लैंगिक अत्याचार अधिनियम पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या घटने मुळे लोकात संताप वायकत केला जात असून येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता .

Unlimited Reseller Hosting