बुलडाणा

शासकीय निमंत्रण पत्रिकेत देऊळगावराजा नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे चे नाव नाही

Advertisements
Advertisements

राजकीय चर्चेला उधाण ,

अमीन शाह

बुलडाणा – बुलडाणा येथील 100 बेडचे स्त्री रुग्णालय तथा अद्ययावत कोविड सेंटर व देऊळगावराजा येथील ट्रामा केअर सेंटर इमारत व कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा उद्या , 10 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या रुग्णालयाचे लोकार्पण करणार आहेत . परंतु या कार्यक्रम पत्रिकेत देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे यांचे नाव नसल्याने वेगळ्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे . बुलडाण्याच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो . सज्जाद यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आहे . मात्र देऊळगाव राजा नगराध्यक्षांचे नाव कुणाच्या सांगण्यावरून वगळले , असा सवाल करत नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांनी केलेले विकासकाम हे आज च्या सत्तेतल्या मंडळींच्या डोळ्यात खुपते आहे का असा प्रश्न ही काही भाजपा च्या मंडळीने केला आहे , देऊळगावराजा नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्या मूळे राजकीय चर्चेला उधाण आले असल्याचे दिसत आहे ,
——————————————–

आकाश फुंडकर , भाजपा आमदार खामगाव ,

सुनीताताई शिंदे ह्या देऊळगावराजा येथील नगराध्यक्षा असून त्या नात्याने शासनाने त्यांचा मान सम्मान केला पाहिजे त्यांचा नाव निमंत्रण पत्रिकेत छापायला हवा व त्यांना रीतसर निमंत्रण देऊन आयोजित कार्यक्रमात बोलवायला हवे मी अजून ती निमंत्रण पत्रिका बघितली नाही ,

———————-/——/————
चिखली येथील भाजपा च्या आमदार शवेता महाले यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क साधला असता नेटवर्क प्रॉब्लम असल्या मुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही ,

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...