बुलडाणा

रस्त्याची झाली दैना;कुणाकडून काहीबी होईना..!

Advertisements
Advertisements

प्रशासन व लोकप्रतिनिधींची उदासीनता….

देऊळगाव राजा/(आदील पठाण):-

देऊळगाव राजा शहर बसस्थानक चौक ते बायपास चौफुली जाफराबाद रस्त्याची अत्यंतदयनीय अवस्था झाली, दुर्दशा झाली असून वाहन चालवावे कसे? असा प्रश्न संजय नगर, हकीम कॉलोनी सह ह्या रस्त्यावर असलेल्या शहरवासीयांना तसेच वाहन चालकांना निर्माण झाला आहे.
विशेष बाब म्हणजे सदर स्त्यावर पोलीस स्टेशन, पोलीस उपविभागिय कार्यालय, पंचायत समिती, खंडकपूर्ना कार्यालय, बी,एस,एन,एल,तहसील कार्यालय, व्यकटेश कॉलेज, असे सर्व शासकीय महत्वाचे कार्यलय ही ह्याच मार्गावर आहे.
परन्तु तरी ही सदर रस्त्या संदर्भात संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी मध्ये उदासीनता दिसून येत आहे.
रस्त्याची दुरावस्था एवढी बिकट आहे की रस्त्यावरील डांबरीकरण गायब झाले आहे ,मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून “रस्त्याची झाली दैना, कोणाकडून काहीबी होईना” असे म्हणायची वेळ परिसरातील जनतेवर आली आहे.
देऊळगाव राजा मधून बायपास ला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. एकेरी असलेला हा रस्ता पूर्णत: उखडून गेला असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. डांबरीकरणाचा रस्ता मातीचा बनला आहे. उंचवटे आणि खड्डे यामुळे वाहनचालकाला वाहन चालवावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील अनेक कालावधी पासून रस्त्याची दुरूस्ती न केल्यामुळे रस्ता उखडून मातीचा झाल्याचे चित्र आहे, तसेच दुचाकी चालक,वयोवृद्धाना,महिलांना खड्डे व उंचवटे असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
आज पर्यंत ह्या स्त्यावर अनेक महिला, पुरुष, वयोवृद्धांचे ह्या खड्यामुळे अपघात झाले आहे. मात्र रस्त्याच्या दुर्दशेकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याची दुरूस्ती करून नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
__________________
दररोज शेकडो जडवाहनांची वर्दळ असलेल्या देऊळगाव राजा शहरातून गेलेला जाफराबाद रोड या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.मार्ग काढताना वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे.
दीपक बोरकर
उपजिल्हा प्रमुख,शिवसेना
_________________
देऊळगाव राजा शहराला बायपास ला जोडणारा मुख्य रस्ता ,जाफराबाद रोड ह्या रस्त्याची अवस्था बसस्थांक चौक ते बायपास चौफुल्ली पर्यंत बिकट दुर्दशा झाली आहे.
अनेक अपघात ह्या रस्त्यावतील खड्यामुळे आज ही मोठ्या प्रमाणात होत आहे.
माजी आमदारांनी ही सत्तेत असंतांना सदर प्रश्न मार्गी लगावला नसून आत्ताचे आमदार ही फक्त बैठका घेण्यात मग्न आहे परन्तु रस्त्याचा प्रश्न आहे त्याच अवस्थेत पडून आहे.
रस्त्याचा प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधी नी मार्गी लावावा अन्यथा खड्यात शिवसंग्राम च्या वतीने बेश्रम चे झाड लावून आंदोलन करू.
राजेश इंगळे
शिवसंग्राम, तालुका अध्यक्ष
_________________
या रस्त्यावर शाळा महाविद्यालय तहसिल कार्यालय, न्यायालय,पंचायत समिती, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ,खडकपूर्णा कार्यालय, पोलिस स्टेशन, हे सर्व महत्वाचे कार्यालय या रस्त्यावर आहेत, रोज हजारो नागरिक या रस्त्यावरून जात असतात, तसेच सर्व लोकप्रतिनिधी ये जा करत असतात मात्र या रस्त्याच्या कामामध्ये कदाचीत कमिशन मिळत नसल्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे?
सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर लोकप्रतिनिधी, व प्रशासना विरुद्ध लवकरच अनोखे आंदोलन करून निषेध व्यक्त करू.
मंगेश तिडके
सामाजिक कार्यकर्ते,
देऊळगाव राजा

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...