विदर्भ

कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासोबतच जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करा – विवेक भीमनवार

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. 4 :- जी व्यक्ती दुखाच्या काळात साथ देते ती व्यक्ती महत्वाची आहे. ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतात त्या त्या वेळेस महसूल विभाग समोर असतो. दरवर्षी कुठले ना कुठले संकट आले आहे. मागील चार महिन्यापासुन कोरोनाचे संकट जगासह जिल्हयावर ओढवले आहे. या कोरोनाच्या संकटाला समारोह जाण्यासाठी आरोग्य, पोलिस विभागासोबतच महसूल विभागाने मोठी जबाबदारी स्विकारुन गेल्या 50 दिवसात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. पुढील काळात कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यासोबतच कोरोना बाधितांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. महसूल दिन कार्यक्रमात अधिकारी कर्मचा-ना त्यांनी यावेळी केले.महसुल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे महसुल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, उपजिल्हाधिकारी श्रीमती मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीष धार्मिक, चंद्रभान खंडाईत, सर्वश्री तहसिलदार तहसिलदार प्रिति डूडूलकर, महेंद्र सोनवने, श्री.सरवदे, सचिन कुमावत, श्री. वानखेडे, श्री. मुंदडा व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळेच आज जिल्हयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक होऊन जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्काराचे श्रेय केवळ जिल्हाधिकां-याना न जाता आपणा सर्वाचे आहे असे श्री भीमनवार म्हणाले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, सुरेश बगळे, श्री. वानखेडे, अजय धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी यशस्वती प्रयत्न केल्याबाबत सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अतुल रासपायले यांनी केले कार्यक्रमाला महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...