मराठवाडा

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी राज्यभरातील मंदिर दर्शनासाठी खुले करा

Advertisements
Advertisements

लक्ष्मण बिलोरे

जालना – जगभरातील हिंदूंची अस्मिता असणाऱ्या प्रभु श्रीरामचंद्राच्या जन्मभूमी मध्ये अर्थात आयोध्या मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या शुभहस्ते मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे पाचशे वर्षांनंतर जगभरातील हिंदूंना यानिमित्ताने न्याय मिळालेला आहे जगभरातील हिंदू या वेळेला आनंदोत्सव साजरे करणार आहेत अशा या शुभ प्रसंगी कोरोना प्रादुर्भाव काळामुळे मंदिरातील दर्शन सुविधा बंद करण्यात आलेली आहे ती कायद्याच्या चौकटीत राहून कायदा-सुव्यवस्था पाळून सामाजिक अंतर राखून त्याचप्रमाणे मास्क सॅनिटायझर इत्यादीचा वापर करून हिंदू धर्मियांच्या या भावनेचा आदर करत मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात यावीत अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

जगभरातील हिंदू यावेळी घरावर भगवी पताका उभारणार आहेत घरावर रोशनाई करणार आहेत दिवे लावणार आहेत घरासमोर रांगोळी काढली जाणार आहे घराघरांवर गुढ्या उभारल्या जाणार आहेत जगभरातील हिंदू हा आनंदोत्सव साजरा करणार आहेत त्यातच कायदा-सुव्यवस्था पाळून दर्शनासाठी मंदिर खुले करणेबाबत आणि दिवसभर टीव्हीवर सुरू असणारे थेट प्रक्षेपण घरबसल्या सर्वांना बघता यावे व घरी बसूनच या भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होता यावे असे लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारीची व माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना देखील पत्र लिहून राज्य सरकारला मंदिरे खुली करण्याबाबत व थेट प्रक्षेपण घरबसल्या बघता यावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वीज पुरवठा खंडित न होणे बाबत सूचना कराव्यात अशी विनंती केली आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...