Home बुलडाणा जानेफळ येथे भीषण आग लागून तीन कोटी रुपयांचे नुकसान…

जानेफळ येथे भीषण आग लागून तीन कोटी रुपयांचे नुकसान…

88
0

पाच दुकाने भस्मसात….

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०५ :- बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे अनेक दुकानांना सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागून पाच दुकाने भस्मसात अग्निशमन दलाच्या गाडीसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते .

आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले आगीमध्ये व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे आग विझविण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते लोकांनी दुकानदारांना साहित्य बाहेर काढण्यासाठी व आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही तर सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
आगीमध्ये दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला त्या मुळे इथे भीतीचे वातावरण पसरले होते .
आग इतकी मोठी होती की त्या आगीने पाहता-पाहता पाच दुकाने भस्मसात केली ,

आग लागलेल्या दुकाने

शेळके एजन्सी, श्री पुष्प ट्रेडर्स, नवदुर्गा बिकानेर स्वीट मार्ट, जीवन धोटे यांचे कृषी केंद्र, गोपाल ढोणे यांचे मोबाईल दुकान इत्यादींसह आगीत बेचिराख झाल्याने दोन ते अडीच कोटीच्या जवळपास नुकसान झाले आहे