Home जळगाव मुस्लिम मंच च्या तेराव्या दिवशी लाक्षणिक उपोषणात तरुणाई ने दोघि हात बांधून...

मुस्लिम मंच च्या तेराव्या दिवशी लाक्षणिक उपोषणात तरुणाई ने दोघि हात बांधून केला निषेध

42
0

भाजप अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष सह पंधरा लोकांनी राजीनामा दिला

शरीफ शेख

रावेर , दि. ०५ :- मुस्लिम मंच द्वारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकत्व कायद्याला विरोध व एन आर सी ला विरोध म्हणून लाक्षणिक उपोषण सुरू असून शनिवारी या उपोषणाचा तेरावा दिवस होता या दिवशी अंजुमन मुस्लिम शाह व अंजुमन खिदमत खल्क, जळगाव व शाहूनगर युवक बिरादरी ने सक्रिय सहभाग नोंदवून उपोषण द्वारे आंदोलन केले.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित तरुणाईने आपले दोघी हात बांधून भाजप सरकारचा निषेध नोंदवून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असून कोणत्याही प्रकारचा शांततेचा भंग करणार नाही व आमचे अल्पसंख्यांक बांधव कधीही शांतता भंग करीत नसल्याचे प्रतीक म्हणून त्यांनी पूर्ण तीन तास आपले दोघी हात बांधून साखळी तयार केली होती व शासनाला निदर्शनास आणले की आपण काहीही केले तरी आम्ही गांधीच्या मार्गाने आंदोलन करू.
भाजप अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांचे राजीनामे

भारतीय नागरिकत्व कायदा व एन आर सी या विषयाला अनुसरून भाजप सरकार हे अल्पसंख्यांक समाजावर अन्याय करीत असल्यामुळे जळगाव शहर महानगर अध्यक्ष शेख इरफान नूरी यांच्या नेतृत्वात एकूण १५ सभसादंनी पद व सभासदत्व चा राजी नामा उपोषणस्थळी येऊन सादर केला व आम्ही मुस्लिम मंच सोबत असून आमचा या कायद्याला विरोध असून हा कायदा जबरदस्ती लावणारया सरकारचा निषेध म्हणून आम्ही आपल्या भाजप सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी लेखी पत्र मंचाचे पदाधिकारी करीम सालार, मुकुंद सपकाळे, गफ्फार मलिक, सय्यद शाहिद व फारुक शेख यांच्याकडे सुपूर्द केले .
महानगराध्यक्ष इरफान नूरी सोबत फिरोज चिष्टी उपाध्यक्ष, सिद्दिक मनियार कार्यालय मंत्री,सादिक रंगरेज युवा अध्यक्ष, गुड्डू शेख उपाध्यक्ष, नूर मोहम्मद उपाध्यक्ष, लुकमान लोखंडवाला उपाध्यक्ष, वसीम खाटीक सचिव, युसूफ खान सचिव, मुनव्वर शेख उपाध्यक्ष, इक्बाल कुरेशी उपाध्यक्ष, अकील मन्यार ,गुड्डू खान व शेख अब्दुल्ला शेख मसूद यांनी आपले राजीनामे सादर केले.
उपोषण स्थळी यांनी केले मार्गदर्शन
डॉक्टर अमानुल्ला शाह, मुस्ताक करिमी, मुस्ताक भिस्ती, शेख हसन, नुसरत गौर, इरफान नूरी, उमेरा मुजफ्फर खान ,कासिम शेख, आदिल शाह, मजिद झकेरिया, फैजान जुबेर, रागिब जागीरदार, करीम सालार, डॉक्टर जबी शाह, रफिक शा, इमरान सिकलिगर, अलफ़ैज़ पटेल यांची भाषणे झाली.

यांनी दिले निवेदन….!!

हाजी आमद शाह यांच्या नेतृत्वात मुस्ताक शा, अकील शाह, मजींद जकेरिया, शेख हसन, डॉक्टर अमानुल्ला शहा, शकीला खाटीक यांनी निवेदन दिले.

यांची होती उपस्थिती….!!!

महमूद शेख अध्यक्ष आयडियल रईस बाबा बागवान, एजाज अहमद, साजिद शेख ,हाजी अहमद शाह ,डॉक्टर एजाज शाह, डॉक्टर शरीफ शाह, अकील शाह, शेख हसन, डॉक्टर जबी शाह, खालील बागवान, शकील शेख, रफीक मोहम्मद, वसीम शेख, सलीम बशीर शाह, मेहमूद शहा, शेख भैय्या, रफिक शेख, जमीला हमीद, नादिया आफरीन, नसरीन कादरी, तहमीना फरीद, रजिया सय्यद, रिजवाना सय्यद, समीना परविन, अस्मा शेख, सम्रीन कलीम खान, रुबीना बानो, इम्रान खान ,मुजाहिद शेख, सायमा शेख, हुमेरा रहीम, अल्फिया फारुख, इकबाल अल्फिया, असिफ़ा शेख, शबनम , समीरा, मुस्कान खान, तहसीन मोहम्मद, शर्मिन, सानिया एकबाल, यास्मीन इस्माईल, निदा बासीत खान आदींची उपस्थिती होती.

Unlimited Reseller Hosting