Home जळगाव पाचोऱ्यात राज्य स्तरिय खुल्या बास्केटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

पाचोऱ्यात राज्य स्तरिय खुल्या बास्केटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

366
0

भारतीय संघाचे माजी कर्णधार संभाजी कदम यांंची उपस्थिती

निखिल मोर

पाचोरा , दि. ०५ :- पाचोरा येथे बास्केटबॉल गृफतर्फे स्व.नितीन मराठे, अजय गौड, दिपक शाहपूरे यांचे समर्थनार्थ प्रकाश झोतातील राज्य स्तरिय खुल्या बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे,भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार संभाजी कदम,पी. टी. सी.चे चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन विलास जोशी, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, उद्योजक मुकुंद बिल्दिकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, संचालक सतीष चौधरी, डॉ पवनशिंग पाटील,प्रा.मालोजीराव भोसले, प्रा. युवराज पाटील आयोजक दिपक पाटील, प्रा.डॉ सचिन भोसले, दिपक (आबा) पाटील, विकास सुर्यवंशी, सुशांत जाधव, जावेद बागवान, तुषार बिऱ्हाडे, संदिप मराठे, अल्पेश कुमावत, ललीत बिरारी, राहुल शिंपी, उपस्थित होते.
पाचोरा येथे चार दिवस चालणाऱ्या खुल्या बास्केटबॉल स्पर्धेत, मुंबई पोलिस, पाचोरा, किंग युनायटेड पूणे, एस. आर. पी. महाराष्ट्र, इंदोर, अमरावती, जबलपूर, धुळे, नाशिक पोलिस, नागपूर, बिलासपूर, जळगांव पोलीस, औरंगाबाद पूणे आर्मी, या संघांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी मुंबई पोलिस व पाचोरा यांच्यात सामना होऊन मुंबईने बाजी मारली, पंच म्हणून रशीद शेख (मुंबई), प्रा, सचिन भोसले, गुणलेखक सुशांत जाधव तर वेळ अधिकारी म्हणून विकास सुर्यवंशी हे काम पहात आहेत. स्पर्धेत चषकासह प्रथम ३१ हजार रुपये, द्वितीय २१ हजार रुपये, तृतीय ११ हजार व चतुर्थ ५ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.