Home बुलडाणा दोन भामट्यांनी नकली पोलीस बनून वृद्धास दीड लाखाने लुटले

दोन भामट्यांनी नकली पोलीस बनून वृद्धास दीड लाखाने लुटले

43
0

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०४ :- खामगाव येथे आज एका वृध्द इसमाला दोन भामट्यांनी नकली पोलीस बनून तबबल दीड लाख रुपये लुटून पोबारा केला असल्याची घटना घडली आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार हिवरखेड येथील गुलाब मनसा राम शिंगाडे हे काही कामा निमित्त खामगाव शहेरात आले होते ते टावर चौकातून जात असताना त्यांना दोन अज्ञात भामट्यांनी रस्त्यात अडविले व तुमच्या थैलीची झडती घ्यायची आहे आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून त्यांनी वृद्ध गुलाब शिंगाडे यांना हिंदी शाळे जवळ नेले व त्यांच्या थैलीत असलेले दीड लाख रुपये लंपास केले दिवस ढवळ्या घळलेल्या घटने मूळे सर्वत्र खळबळ उडाली आहे या प्रकरणी गुलाब शिंगाडे यांच्या तक्रारी वरून दोन अज्ञात भामट्यां विरोधात भा , द . वि , 420 , 170 , 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या दोन भामट्यांचा शोध घेत आहे .

Unlimited Reseller Hosting