Home महाराष्ट्र क्रिकेट खेळतांना मैदानातच ठाणेदारा झाला मृत्यू

क्रिकेट खेळतांना मैदानातच ठाणेदारा झाला मृत्यू

85
0

दुःखद घटना….

अमीन शाह

पालघर , दि. 04 :- जिल्ह्यातील सफाळे पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसंत सानप वय 38 वर्ष मूळचे नाशिक येथील राहणारे गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. त्यांच्या पार्थिवावर त्याचे मूळ गावी नाशिक येथे अंत्यसंस्कार होतील.

रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात आज क्रिकेटचे सामने घेण्यात आले, त्यावेळी मैदानात खेळत असताना सपोनि सानप याना मेजर अटॅक आला, त्यांना तत्काळ वसई येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला,त्यांच्या अश्या अचानक झालेल्या निधना मुळे सर्वत्र दुःख वयकत केले जात आहे .