Home विदर्भ शिवसैनिकांनी केली ना. संजय राठोड यांची पेढे तुला….

शिवसैनिकांनी केली ना. संजय राठोड यांची पेढे तुला….

146
0

सायकलने गेले समर्थकाकडे

स्वागतासाठी उसळली गर्दी

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. ०४ :- राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचे आज शनिवारी यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले. त्यानिमित्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांची पेढे तुला करून हे पेढे नागरिकांना वाटले. दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि संजय राठोड कॅबिनेट मंत्री व्हावे म्हणून तुळजापूर येथे साकयलने जाऊन भवानी चरणी प्रार्थना करणारे येथील शिवसैनिक गिरीष व्यास यांच्या घरापर्यंत संजय राठोड यांनी सायकलने जाऊन कृतज्ञता व्यक्त केली.

नागपूर व अकोला येथील जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आटोपून ना. संजय राठोड आज पहाटे यवतमाळ येथे पोहचले. त्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांसह समर्थकांनी अभिनंदनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. शिवसैनिक गिरीष व्यास यांच्या घरी सायकलने जाऊन सदिच्छा भेट दिल्यानंतर ते विश्रामभवनावर पोहचले. तिथे जमलेल्या शेकडो शिवसैनिकांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांची पेढेतुला करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर, जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीधर माहोड यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, विद्यार्थी सेना, एस. टी. कामगार सेना पदाधिकारी तसेच महाविकास आघाडी मधील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

Unlimited Reseller Hosting