Home महत्वाची बातमी पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर

पत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर

67
0

अध्यक्षपदी श्रीकांत कसबे कार्याध्यक्षपदी जाकीर नदाफ यांची निवड

पंढरपूर , दि. ४ :- पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र या संघटनेची पंढरपूर शहर व तालुका वार्षिक सर्वसाधारण सभा आज संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील नुतन पदाधिका-यांच्या निवडी करण्यात आल्या.

अध्यक्षपदी श्रीकांत कसबे, कार्याध्यक्षपदी जाकिर नदाफ, उपाध्यक्षपदी उमेश टोमके व तानाजी जाधव, सचिवपदी लखन साळुंखे, सहसचिवपदी जैनुद्दीन मुलाणी, खजिनदारपदी अशोक पवार, प्रसिद्धी प्रमुखपदी संजय हेगडे आदींची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष विरेंद्रसिंह उत्पात व माजी पदाधिकारी यांचे हस्ते सर्व नुतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, शंकर कदम, डॉ. राजेश फडे, लक्ष्मण जाधव, गौतम जाधव, शंकर पवार, संतोष कांबळे, धीरज साळुंखे, शरद कारटकर, आनंद भोसले आदी सदस्य उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting