
बोरजवळा येथील ते अर्भक नसून बाहुली…!
अमीन शाह
खामगाव – सध्या सर्वत्र कोरोणाने हाहाकार घातला असून या कारणामुळे कोणी कुणाला हात लावत नाही. बोरजवळा येथील धरणामध्ये नवजात अर्भक मिळल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पंचनामा केला .सदर अर्भक ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्याला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले.मात्र डॉक्टरांनी जेव्हा ते बालक हात लावून शवविच्छेदण्यासाठी पाहिले असता ते नवजात बालक नसून एक बाहूला असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी पंचनामा कसा केला , काय केला काय पाहिले त्या बाळाची कशी पाहणी केली, पंचनामा करताना कोणत्या बाबी चा उलगडा करण्यात आला. याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असून फक्त कोरोणामुळे कोणी कोणाला हात लावत नसल्यामुळे या नवजात बालकांच्या बाबतीत सुद्धा असे घडले असावे असे वाटते मात्र ते नवजात बालक नसून ते एक बाहुली असल्याचे खामगाव सामान्य रुग्णालय कडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे.
त्या बालकाला नवजात अर्भक म्हणून नाही तर ती एक बाहूली आहे असे आता सुद्धा रुग्णालय सूत्रांनी सांगितले आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा केली जात असून फक्त करोना च्या भिती मूळेच हा प्रकार घडल्याचे लक्षात येते .












































