विदर्भ

बहादरपूर येथील आंजी पारधी बेड्यावर जीवनाश्यक वस्तु वाटप.!

Advertisements
Advertisements

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील आंजी येथील बहादरपूर पारधी बेड्यातील समुदायातील १५ कुटुंबांना जीवनाश्यक वस्तु किराणा स्वरुपात कोरो इंडिया संघटना, मुंबई च्या सहकार्यातून माध्यम साक्षरता संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आले. कोरोनाच्या कोविड -१९ विषाणू मुळे लॉकडाऊन असल्याने अनेक प्रकारच्या समस्या या समूहात निर्माण झाल्या आहे. विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी माध्यम साक्षारता संस्थेची जनजागृती मोहीम सुरू याच पार्श्वभूमीवर संस्थेने कोरोना जनजागृती व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवळी पंचायत समितीचे गटविकास श्री. बारापात्रे यांच्या सह ग्रामपंचायत सचिव व माध्यम साक्षरता संस्था प्रमुख विजय पचारे, नेतृत्व विकास कार्यक्रमाचे लीडर सांगर पायघन, सोबतच माध्यम साक्षरता संस्थेचे कार्यकर्ते चेतन अड़ेकार, मयूर भोकटे, हर्शल डुकरे, आणि पारधी वस्तीवरील नागरिक उपस्थित होते. पावसाळा चालू असल्यामूळे पारधी वस्तीवर मोटरसायकल व चारचाकी जात नसल्यामुळे वस्तीच्या बाहेर २-३ किलोमीटर अंतरावर डांबर रोडवरच हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पारधी वस्तीवरील नागरीकांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे आपल्या विविध समस्या मांड़ल्या.
कोविड १९ विषाणू संसर्ग टाळण्यासाठी आपण नियमित तोंडाला मास्क किंवा स्वच्छ कापड बांधणे, वस्तीवर अनवोळखी व्यक्ती आली की ग्रामपंचायत ला सूचित करणे, नवीन ठिकाणी विनाकारण जाऊ नये, नेहमी हात साबणाने स्वछ करावे अश्या प्रकारचे मार्गदर्शन केले. तर माध्यम साक्षारता संस्थेच्या कार्याची स्तुती करीत वस्तीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक राहुल जुमडे यांनी संचालन केले, प्रस्ताविक सागर पायघन यांनी तर आभार विजय पचारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बेड्या वरील उषाताई भोसले, प्रशांत काळे, नलुबाई पवार इत्यादींनी सहकार्य केले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...