Home बुलडाणा विवाहीतेला शेतात एकटे पाहून केला विनयभंग* *आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

विवाहीतेला शेतात एकटे पाहून केला विनयभंग* *आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

319

प्रतिनिधी:-(रवि आण्णा जाधव)
देऊळगाव राजा : – शेतात विवाहिता एकटी काम करीत आहे . या संधीचा गैरफायदा घेऊन वाईट उद्देशाने हिवाहितेचा हात धरून वियभंग केला . अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सरंबा येथील आरोपी समाधान केशव चेके याने एक महिला शेतात एकटी काम करीत असल्याचे पाहून तिच्या पाठीमागून जावून वाईट उद्देशाने विवाहीतेचा हात धरून विनयभंग केला अशी तक्रार विवाहितेने अंढेरा पोलीस स्टेशनला दाखल केली . अशा तक्रारीवरून ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार शाकिर पटेल यांनी आरोपी विरुद्ध अप न ११६ कलम ३५४ ,३५४ अ ,५०४ ,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.