Home जळगाव जळगावकरांना दिलासा; 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह

जळगावकरांना दिलासा; 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह

58
0

– अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच जणांचा समावेश

एजास शाह ,

जळगाव- येथील कोविड रूग्णालयात गेल्या तीन दिवसापूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्ती पैकी 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल *निगेटिव्ह* आले आहेत. यामुळे जळगाव जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यामध्ये अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.
सुरुवातीला ग्रीन झोन कडे असणारी जळगाव जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे झालेली आहे. अशा परिस्थितीत 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला असून, अद्यापही काळजी घेतल्यास जळगावची रेड झोन कडे असणारी वाटचाल थांबू शकते हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.