Home मुंबई राज्यात १ कोटी ५२ लाख शिधापत्रिकाधारकांना ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल...

राज्यात १ कोटी ५२ लाख शिधापत्रिकाधारकांना ६३ लाख ६५ हजार ८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप- छगन भुजबळ

203
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 52 लाख 12 हजार 724 शिधापत्रिका धारकांना 63 लाख 65 हजार 8 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा रेशनकार्ड धारकांची संख्या 1 कोटी 60 लाख आहे. त्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्याचे वितरण केले जाते. या योजनेमधून सुमारे 20 लाख 12 हजार 533 क्विंटल गहू, 15 लाख 54 हजार 604 क्विंटल तांदूळ, तर 19 हजार 92 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 8 लाख 24 हजार 793 शिधापत्रिका धारकांनी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.याअंतर्गत त्यांना राहत्या ठिकाणीच अन्नधान्य पुरवण्यात येते.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी दर महिन्याला 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. दि. 3 एप्रिलपासून एकूण 1 कोटी 23 लाख 13 हजार 634 रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. या रेशनकार्डवरील 5 कोटी 59 लाख 57 हजार 425 लोकसंख्येला 27 लाख 97 हजार 870 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.