Home विदर्भ लाॅकडाऊन मुळे केळी उत्पादक आर्थीक संकटात

लाॅकडाऊन मुळे केळी उत्पादक आर्थीक संकटात

53
0

अकोट – देवानंद खिरकर

अकोला / अकोट – तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी आपल्या शेतीच्या उपजीविकेवर अवलंबुन आहे. शेतकर्यावर केंव्हा आसमानी तर केव्हां सुलतांनी संकटांने या परिसरातील बागायतदार शेतकरी कोरोनाच्या प्रादुर्भावाने मोळकळीस आला आहे.यात जास्तीत जास्त केळी ऊत्पादक शेतकरी घरात आलेले केळीचे पिक घरातच सडत असता़नां रडकुंडीस आला आहे. केळी हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते मागिल वर्षी केळीला १५००रूपये भाव होता . परंतू या वर्षी वर्षेभर अंत्त्त्यंत काटेकोरपणे नियोजन व संगोपन करून केळीच्या बागायता सज्ज आहेत. दर्जा ऊत्तम असुनही लाॅकडाऊन चर्या फटक्यात शेतकरी अडकला आहे. आजच्या स्थितीत व्यापारी केवळ दोनशे पन्नास ते तिनशे रूपयेच्यावर भाव द्यायला तयार नाहीत त्यामुळे केळी घरातच सडत आहेत . एकीकडे शेती माला करिता वाहतूक चालु असल्याचा गाजा वाजा होत आहे .प्रत्यक्षात मात्र शेतकर्याच्या नशीबी तसे होताना दिसत नाही. केळी हे नाशवंत फळ पिक असल्याने साठवून ठेवता येत नाही शेतकर्यांच्या या हतबलीचा गैरफायदा व्यापारी वर्ग घेत असल्याने शेतकऱ्यांचे हेक्टरी पाच ते सहा लाखांचे नुकसान होत आहे. या मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने केळी उत्पादक शेतकरयांना न्याय देन्याची मागनी केळी उत्पादक संदीप मधुकर भुस्कट यांनी केली आहे.