Home विदर्भ अंदोरीच्या बोगस डाॅक्टरला देवळी पोलीसांकडुन अटक.!

अंदोरीच्या बोगस डाॅक्टरला देवळी पोलीसांकडुन अटक.!

142

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसतांना बर्याच दिवसापासुन बोगस डाॅक्टरकीचा व्यवसाय करणार्या बोगस डाॅक्टरला देवळी पोलीसांनी अटक केली आहे.

देवळी तालुक्यातील अंदोरी येथील स्वागत क्लिनिक सांभाळणारे विलास नांदे यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे त्यांची नोंदनी नसताणा ते डॉक्टर या पदवीचा रबरी स्टॉम्प ऑलोपेथीक औषधी वापरताना तालुका बोगस डॉक्टर शोध समिती याना मिळुन आल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण धमाने यांच्या लेखी तक्रारी वरुण विलास नांदे यांच्याविरुद्ध वैद्यकीय व्यवसायी अधिनियम 1961 अन्वये गुन्हा पोलीस स्टेशन देवळी येथे नोंद करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार नितिन लेव्हरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अरविंद शिंदे करत आहे.सदर गुन्हयात आरोपी विलास नांदे यांना अटक करण्यात आली आहे.