Home विदर्भ चोहोट्टा बाजार येथील महिलेची अशीही सेवा…!

चोहोट्टा बाजार येथील महिलेची अशीही सेवा…!

66
0

अकोट – देवानंद खिरकर

अकोला – कोरोना विषाणूमुळे सर्वञ लाॅकडाऊन असताना अकोट अकोला मार्गावर असलेल्या चोहोट्टा बाजार येथील महिला रूग्णवाहिकांना अनेक वर्षापासुन मोफत पंचर काढुन देत आहेत. त्यांच्या ह्या सेवाभावी कार्याचे सर्वञ कौतुक होत आहे चोहोट्टा बाजार येथील महिला सरिता राजाराम वानखडे ह्या पुरूषांची मक्तेदारी असलेल्या पंचर काढण्याचा व्यवसाय करतात आपली सामाजिक जाणीव जपत त्यांनी अनेक वर्षापासुन रूग्ण सेवा देणाय्रा वाहनांचे पंचर मोफत काढत आहेत त्या मोटारसायकलपासुन ते जडवाहनांपर्यत सर्वच वाहनांचे पंचर काढण्याचे मेहनतीचे काम करतात त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तीन वर्षापासुन या मार्गाचे काम चालु असल्यामुळे अनेक वाहन पंचर होतात अशातच अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देत रूग्ण सेवा देणाय्रा रूगणवाहिकेचे पंचर कोणतेही शुल्क न घेता २४ तास मोफत सेवा देण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.