Home मराठवाडा लॉकडाउन सत्कार्णी लावा – दुर्गादेवी कच्छवे

लॉकडाउन सत्कार्णी लावा – दुर्गादेवी कच्छवे

51
0

अनेक जण आजही सोशल मिडियापासून दुरच असल्याने घरातील बंदिस्त वेळ कसा घालवावा? या विवंचनेत दिवस काढत आहेत. परिणामी त्यांची त्यांची मानसिक अवस्था बिकट होताना दिसत आहे.

नांदेड , (प्रशांत बारादे ) – कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे. परिणामी महिनाभरापासून विद्यार्थ्यांसह शिक्षकही घरातच बसून आहेत. हा रिकामा वेळ सत्कार्णी लागावा म्हणून एका इंग्रजी शाळेच्या प्राचार्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.लॉकडाऊनमुळे अर्थचक्र पूर्णत: कोसळले आहे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना जीवन जगण्यासाठी काठीण्य पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. दररोज कष्ट करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंबे आहेत. त्यांना मदत करण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्थांसह काही नागरिकही पुढे येत आहेत. धान्य, किराणा आदींची मदत दिली जात आहे. त्यामुळे काहीअंशी प्रमाणात का होईना त्यांना आपल्या आयुष्यात आशेचा किरण दिसत आहे. असे असले तरी इतर गरजा (मुलांचे शिक्षण, दवाखाना आदी) मात्र अर्थचक्र थांबल्याने पूर्ण करता येत नाही.लॉकडाउनने अनेकांची जीवनशैली अक्षरशः बदलून टाकली आहे. चार भिंतींच्या आत असल्याने पालकांसह मुलांमध्येही चिडचिडेपणा आता जाणवू लागला आहे. त्यावर काय उपाय करावा यासाठी डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ, लेखक तसेच प्रसिद्धीमाध्यमे मार्गदर्शन करत आहेत. त्याचा काहीअंशी परिणामही होताना दिसत आहे. परंतु अनेक जण आजही सोशल मिडियापासून दुरच असल्याने घरातील बंदिस्त वेळ कसा घालवावा? या विवंचनेत दिवस काढत आहेत. परिणामी त्यांची त्यांची मानसिक अवस्था बिकट होताना दिसत आहे.व्हाट्सप ग्रुपचा असाही फायदासोशल मिडिया म्हणजे केवळ
करमणूक आहे, असा समज आतापर्यंत बहुतेकांचा होता. परंतु लॉकडाउनमध्ये त्याचाच आधार आता वेळ सत्कार्णी लावण्यासाठी होत आहे. शाळांना सुट्ट्या असल्याने विद्यार्थी, शिक्षक घरीच आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अभ्यासक्रम द्यायला सुरुवात केलीआहे. विद्यार्थीही हा अभ्यासक्रम करत असून, विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यासाठी पालकांचाही वेळ सत्कार्णी लागत आहे. याशिवाय काही शिक्षक हे मुलांमधील कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. म्हाडा कॉलनीतील प्राचार्या दुर्गादेवी कच्छवे या परिसरातील अनाथ, गरजू मुलींना एकत्र करून त्यांना शिवणकाम तसेच हस्तकलेचे प्रशिक्षण अगदी मोफत देत आहे. आपल्यातील कला इतरांना द्यावा, लॉकडाउनच्या काळातील रिकामा वेळ सत्कार्णी लागावा यासाठी हे प्रशिक्षण देत असल्याची भावना दुर्गादेवी कच्छवे यांनी व्यक्त केली.लॉकडाउन शिक्षा नसून संधी आहेलॉकडाउन ही शिक्षा नसून संधी आहे. त्यामुळे हा कालावधी सत्कार्णी लावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. म्हाडा कॉलनी परिसरातील अनाथ, गरजू मुलींना घरी शिवणकाम, हस्तकला आदींचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालनही करत आहेत .दुर्गादेवी कच्छवे , प्राचार्या( कच्छवेज गुरुकुल स्कूल, नांदेड )