Home विदर्भ सिमेंट वाहतूक जिल्हा बंदी सीमा उल्लंघन नागरिकांच्या जिवाला धोका?

सिमेंट वाहतूक जिल्हा बंदी सीमा उल्लंघन नागरिकांच्या जिवाला धोका?

455

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपूर – जिल्ह्याच्या तेलंगाना व यवतमाळ सीमेलगत कोरपना तालुक्यात नामांकित अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट अंबुजा सिमेंट कंपनींना उत्पादन व वाहतुकीसाठी मंजुरी मिळाल्याने राज्यमार्ग जिल्‍हा मार्गावर सिमेंट वाहनाची वर्दळ वाढल्याने परिसरात नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केल्या जात आहे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या डॉक्टरी तंत्राचा वापर करून चंद्रपुर जिल्हा कोरोना या जीवघेण्या आजारापासून कोविड१९ मध्ये नियोजनबद्ध व योग्य नियंत्रणात लॉग डाऊन परिस्थितीत संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करून सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरले मात्र लगतच्या रेड झोन मध्ये असलेल्या तेलंगणा राज्यातील व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील रेड झोन मध्ये असलेल्या शहरांमध्ये या भागातून ट्रक द्वारे सिमेंट वाहतूक होत आहे .

लगतच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये नागरिकांना सुद्धा जाणे-येणे बंद असताना व या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास मनाई असताना ग्रामीण भागामध्ये शासन व प्रशासनाच्या तथा लोकप्रतिनिधीच्या आव्हान आत्मसात करून गावे लॉक डाऊन? गावाच्या सीमा बंद करून नागरिक सक्रिय पालन करीत असताना मात्र सिमेंट उद्योग कंपनीला उत्पादन व वाहतूक सुरु झाल्यामुळे संचारबंदी व . लॉक डाऊन नियमाचे उल्लंघन परिसरात होऊ लागल्याने नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण मुळे धास्तावले आहे राक्षस रुपी कोरोना संसर्ग बाहेरच्या जिल्ह्यातून परत येणारी वाहतूक वाहन चालक-वाहक यांच्यामुळे शिरकाव झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे सिमेंट कंपनीमध्ये कामगार बाहेर गावातून व स्थानिक यांच्यात रेलचेल सुरू झाली बाहेर जिल्ह्यातून वाहन परत येताना तालुक्याच्या सीमेवर चालक वाहक यांच्या तपासणीकरिता यंत्रणा उपलब्ध नाही तसेच जिल्ह्याच्या सीमे मध्ये सॅनिटायझेशन करण्याचे सीमेलगत कुठेच व्यवस्था करण्यात आलेली नाही सिमेंट भरून गेलेली वाहन ठराविक वेळेत वाहनातील सिमेंट खाली होत नाही संसर्ग बांधीत क्षेत्रात अनेक दिवस उभे राहतात तसेच खानपान साठी चालक-वाहक त्याठिकाणी फेरफटका मारतात रस्त्यावरील भोजनालय नदी व पेट्रोल पंपावर सोशल डिस्टन्स इन नियमाचे उल्लंघन होत असते अनेक चालक नदीवर वाहन उभे ठेवून आंघोळ करतात वाहन धुतात हा प्रकार आजार वाढविण्यास पोषक निर्माण करू शकते पर्यावरण व प्रदूषण वाढ होऊन कोरपना तालुक्यातील सिमेंट उद्योग पंचक्रोशीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुंबईसह राज्यात सुरु असलेला कोरोना प्रकोपामुळे नागरिकांमध्ये भीती व असंतोष वाढत आहे अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस वाहन कोणत्याही ठिकाणी ठेवून वाहन चालक वाहक आराम करतात अशावेळी पालघर सारख्या घटना घडून उद्रेक होण्याचा संभव देखील नाकारता येत नाही नागरिकांच्या भावना तीव्र होणार नाही यासाठी कठोर निर्देश वाहतूक नियम पाडण्यास कंपनी ना आदेश द्यावे तसेच जिल्हा बंदी उल्लंघन न होता व आजाराचा वाईट परिणाम आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांना होऊ नये व जिल्हा सुरक्षित रहावा याकरिता ट्रक द्वारे सिमेंट वाहतूक बंद करणे करण्यात यावी मालगाडी रेल्वे लाईन द्वारे सिमेंट वाहतूक करण्याचा पर्याय निवड करण्यात यावा लॉक डाऊन संचार बंदीचा भंग होणार नाही व सुरक्षित असलेला चंद्रपूर जिल्ह्याला धोक्याच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी सिमेंट वाहतूक निर्णय शासनाने स्थगित करावा अशी मागणी सत्याग्रह संघटनेचे स आबीद अली पुरुषोत्तम अस्वले विनोद जुमडे वसंता मळावी चंद्रभान तोडासे यांनी तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धवजीठाकरे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.